''सरकार फक्त श्रेय घेत राहिलं''... अमर्त्य सेन यांचा मोदी सरकारवर घणाघात

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 जून 2021

औषध निर्मितीच्या बाबतीत भारत समर्थ आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढू लागला असताना त्याच वेळी ऑक्सिजन (Oxygen) आणि लसीच्या तुटवड्याचं दुसरं संकट देखील देशासमोर उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर वैज्ञकीय तज्ञांनी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोदी सरकारच्या एकूण धोरणावर टीका केली असताना आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते आणि अर्थतज्ञ अमर्त्य सेन(Amartya Sen) यांनी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी मोदी सरकारला जबाबदार असल्याची भूमिका मांडली आहे. ''एकूणच संभ्रमावस्थेत असलेल्या मोदी सरकारने झालेल्या गोष्टींचं श्रेय घेण्यावरच आपलं लक्ष केंद्रीय केले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि देशात कोरोनाची ही अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली,'' असे ते म्हणाले. (The government just kept taking credit Amartya Sen slammed the Modi government)

आपल्या मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष
या आगोदर भारतातील कोरोना परिस्थितीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फौची (Dr. Fauci) यांनी देखील आपली अत्यंत परखड भूमिका मांडली होती. त्यानंतर आता नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी देखील मोदी सरकारच्या (Modi government) कोरोनाविषयक धोरणावर ताशेरे ओढले होते. औषध निर्मितीच्या बाबतीत भारत समर्थ आहे. त्यामुळे कोरोनाच्या साथीचा भारत (India) योग्य प्रकारे सामना करु शकला असता. मात्र सरकारी पातळीवर असलेल्या एकूणच संभ्रमामुळे आपल्या बलस्थानांकडे आपण लक्ष केंद्रीत करु शकलो नाही, असं देखील ते यावेळी म्हणाले. मुंबईत शुक्रवारी आयोजित केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

''...अंमलबजावणी न झाल्यास'', केंद्र सरकारचा Twitter ला...

जगाकडे आपण लक्ष देत राहिलो!
दरम्यान, यावेळी बोलताना अर्थशास्त्री अमर्त्य सेन यांनी मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर देखील आपले आक्षेप नोंदवले होते. ''जागतिक स्तरावर केंद्र सरकार आपली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत राहिलं की संपूर्ण जगाला भारत वाचवेल. परंतु त्याचवेळी देशात कोरोनाची समस्या वाढवण्यासाठी आणि लोकांना कोरोनाचा विळखा बसण्याकडे दुर्लक्ष करत राहिलं. आधिच सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग, बेरोजगारी अशा समस्या कोरोना काळात अधिक अजून गंभीर झाल्या आहेत,'' असं ते म्हणाले.

सध्याची आकडेवारी...
देशात गेल्या चोवीस तासात एक लाख 20 हजार 529 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील उपचाराधिन असलेल्या रुग्णांची संख्या आता 15 लाख 55 हजार 248 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे काल दिवसभरात एक लाख 97 हजार 894 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता आता दोन कोटी 67 लाख 95 हजार 549 वर पोहोचली आहे. देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दरही आता 93.38 टक्के एवढा झाला आहे.
 

संबंधित बातम्या