"सरकार सकारात्मकतेच्या नावाखाली खोटा अजेंडा चालवते आहे"

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

कोरोना काळात केंद्र  केलेल्या कामांवर देखील विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केल्याचे पाहायला मिळते आहे.

देशात कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Corona Second Wave) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमध्ये देशाच्या आरोग्यव्यवस्थेचे  (Healthcare System) भीषण वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवरच देशातील  विरोधी पक्षातील नेतेमंडळी केंद्र सरकारवर टीका करता आहेत. यावेळी कोरोना काळात केंद्र  केलेल्या कामांवर देखील विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केल्याचे पाहायला मिळते आहे. याच परिस्थितीमध्ये  भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सकारात्मकता निर्माण करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी टीकास्त्र सोडले आहे. (Government is pursuing a false agenda in the name of positivity)

दिल्लीला कोवॅक्सिन लसीचे डोस द्यायला नकार; उपमुख्यमंत्री सिसोदिया आक्रमक

देशात सध्या कुरण संक्रमणाची दुसरी लाट सुरु असून, विषाणूच्या संक्रमांसोबतच आरोग्य व्यवस्थेच्या अपयशामुळे देखील अनेकांचे  जीव जात आहेत. मेडिकल ऑक्सिजन, औषधी आणि बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची तारांबळ उडते आहे. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सकारात्मकता निर्माण करण्यासाठी वेगेवेगळे कार्यक्रम केले जात आहेत. यावर काँग्रेसाचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. "वाळूत तोंड लपवणे ही सकारात्मकता नाही तर देशातील जनतेला धोका देणे आहे" असे म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. 

तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुले चर्चेत असलेले राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी ही सरकारची रणनीती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. "आजूबाजूला सगळीकडे दुःखद घटना घडत असताना आणि देश शोकमग्न अवस्थेत असताना सकारात्मकतेच्या नावाखाली सरकार आपला खोटा अजेंडा रेटून नेते आहे." अशी गंभीर टीका केली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, 'सकारात्मकता पसरवण्यासाठी आपल्याला अंध होवून सरकारचा अजेंडा चालवण्याची आवश्यकता नाही.' असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

संबंधित बातम्या