खते क्षेत्राशी संबंधित भागधारकांशी गौडा यांनी साधला संवाद

pib
बुधवार, 20 मे 2020

देशभरातल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत त्यांना परवडणा-या किंमतीमध्ये खते मिळाली पाहिजेत, यासाठी कार्यपद्धतीमध्ये सातत्याने सुधारणा प्रक्रिया सुरू ठेवण्याची गरज आहे,

नवी दिल्ली, 

केंद्रीय रसायन आणि खते खात्याचे मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी आज विविध राज्यातल्या सरकारी अधिकारी, खते विभागातले अधिकारी, प्रगतिशील शेतकरी आणि खते क्षेत्राशी संबंधित भागधारकांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. 

या बैठकीमध्ये खत उद्योगामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेवून कोणत्या उपाय योजना करता येतील, याविषयी संबंधितांनी महत्वपूर्ण अभिप्राय दिले. 

देशभरातल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत त्यांना परवडणा-या किंमतीमध्ये खते मिळाली पाहिजेत, यासाठी कार्यपद्धतीमध्ये सातत्याने सुधारणा प्रक्रिया सुरू ठेवण्याची गरज आहे, असं गौडा यावेळी म्हणाले. कार्यक्षमता वृद्धीसाठी सर्व संबंधित सहभागितांनी आपली मते मोकळेपणाने मांडली तर याविषयी शासनाला धोरणात्मक अंतिम निर्णय घेताना त्या सूचनांचा, नव्या योजनांमध्ये समावेश करता येईल, असंही गौडा यावेळी म्हणाले. 

या बैटकीला खते विभागाचे सचिव, अतिरिक्त सचिव, केरळ आणि ओरिसा राज्य सरकारांचे अधिकारी आणि खत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

संबंधित बातम्या