दिव्यांगांना मोठा दिलासा... घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा लाभ

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

आता दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करुण देणं अनिवार्य असणार आहे. 

दिव्यांग नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानंतर, आता दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करुन देणं  अनिवार्य असणार आहे. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने (Social And Justice Emowerment Ministry) याबद्दलचा अध्यादेश काढला आहे. त्याचबरोबर या मंत्रालयाच्या दिव्यांग विभागाने याबद्दलचं सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ट्विट देखील केलं आहे.  (Great relief to the disabled  The benefit of Ya facility can be availed at home)

या ट्विटद्वारे, दिव्यांग प्रमाणपत्र आता फक्त UDID या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करुन देणं सगळ्या राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना अनिवार्य असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार आहे. (Great relief to the disabled  The benefit of Ya facility can be availed at home)

Delhi Oxygen Crisis: केजरीवालांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

गेल्या काही दिवसांपासून ही मागणी करण्यात येत होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लागू केलेल्या विविध निर्बंधांमुळे दिव्यागांना हे प्रमाणपत्र मिळवण्यात अनेक अडचणी येत होत्या. या प्रमाणपत्रामुळे दिव्यांग नागरिकांना सरकारच्या अनेक सेवासुविधांचा लाभ घेता येणार आहे.
 

संबंधित बातम्या