तामिळनाडु सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 16.13 लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

तामिळनाडू सरकारने आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सहकारी बॅंकेकडून घेतलेले पीक कर्ज तामिळनाडु सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडू सरकारने आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सहकारी बॅंकेकडून घेतलेले पीक कर्ज तामिळनाडु सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी शेतकऱ्यांनी सहकारी बँकांकडून घेतलेले पीक कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा केली आहे. तामिळनाडू सरकारच्या या निर्णयामुळे अंदाजे 16.13 लाख शेतकर्‍यांना फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले. 

गोव्यातील कार्निव्हल रद्द करण्याची मागणी

शुक्रवारी विधानसभेत नियम 110 अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले 12,110 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ केले जाईल. राज्यात चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अजून बिकट झाली असून, शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणुन हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांची  नुकसान भरपाई म्हणून 1117 कोटी रुपये दिले जाणार असल्याचे म्हणून, याचा फायदा सुमारे 11 लाख शेतकर्‍यांना होईल, असे ते म्हणाले होते. 

"गोवा सरकारने सर्वसामान्यांवर दरवाढ लादली"

तामिळनाडू राज्यात जानेवारी मध्ये अतीवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. 1 जानेवारी पासुन ते 5 जानेवारी पर्यंत मुसळधार पाऊस झाला होता. आणि यामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकाचे नुकसान झाले होते. नुकसान तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथकही राज्यात आले होते. त्यानंतर पुडुकोटाई जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार पावसामुळे धान, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर तंजावर जिल्ह्यात धान व भुईमूग या डाळींचेही नुकसान झाले आहे. तसेच विरुधुननगर जिल्ह्यात पावसामुळे धान, डाळी, कापूस आदी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने निवेदनात दिली होती. 

संबंधित बातम्या