प्रेमाचे दोन शब्द, गोड मिठी अन् मग मैत्रिणीचा क्रूर शेवट; स्वत:लाही संपवलं!

Greater Noida: राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
 Crime
Crime Dainik Gomantak

Youth shot Girl and Shot himself in Greater Noida: राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे शिव नाडर विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने मैत्रीणीची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

अनुज असे या मुलाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रहिवासी असून शिव नाडर विद्यापीठात तो बीएच्या तृतीय वर्षाच्या समाजशास्त्राचे शिक्षण घेत होता.

त्याचवेळी, तरुणी उत्तर प्रदेशातील कानपूरची रहिवासी होती. दोघांची मैत्री खूप घट्ट असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण असून पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.

गोळी मारली

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी शिव नाडर विद्यापीठात (Shiv Nadar University) बीए समाजशास्त्राच्या तृतीय वर्षात एकत्र शिकत होते.

त्यानंतर, तरुणाने अचानक पिस्तूल काढून तिच्यावर गोळी झाडली. जखमी अवस्थेत तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी (Doctor) तिला मृत घोषित केले.

 Crime
Madhya Pradesh Crime: मुस्लिम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरुन हिंदू तरुणाची हत्या, खळबळजनक घटनेने उडाला थरकाप!

मैत्रीणीची हत्या केल्यानंतर मुलाने आत्महत्या केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रीणीवर गोळी झाडल्यानंतर आरोपीने मुलांच्या वसतिगृहातील 328 क्रमांकाच्या खोलीत जाऊन स्वतःवर गोळी झाडली, त्याचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी (Accused) तरुण आणि मृत तरुणी हे पूर्वीपासून एकमेकांचे चांगले मित्र होते, त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. दोघांच्याही कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फील्ड युनिटला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे, घटनास्थळ पिंक टेपने सुरक्षित करण्यात आले आहे. इतर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

 Crime
Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! चॉकलेटचे आमिष दाखवून 2 सख्ख्या बहिणींवर बलात्कार

पोलिसांनी कॉलेज कॅम्पसमध्ये तपास सुरु केला

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना शिव नाडर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये घडली असून सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत.

विद्यार्थ्याकडे बंदूक कुठून आली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मृत तरुणी अनुजची चांगली मैत्रिणी होती, मग दोघांमध्ये कशावरुन वाद सुरु होता, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com