कोरोनावर मात केलेल्या 34 वर्षीय रुग्णाला हिरव्या बुरशीचा संसर्ग; देशातील पहिलचं प्रकरण

कोरोनावर मात केलेल्या 34 वर्षीय रुग्णाला हिरव्या बुरशीचा संसर्ग; देशातील पहिलचं प्रकरण
hinduja.jpg

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात केलेल्या 34 वर्षीय रुग्णाला हिरव्या बुरशीची लागण झाली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) इंदौरमध्ये (Indore) या रुग्णाला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईमध्ये आणण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आपल्याला म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) लागण झाल्याची भीती असल्याने कोरोना रुग्णाने चाचणी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या छातीच्या आजार विभागाचे प्रमुख डॉक्टर रवी दोशी (Ravi Doshi) यांनी यासंबंधीची महिती देताना म्हटले, ''हा रुग्ण कोरोनातून ठीक झाला होता. दरम्यान त्याला स्वता:ला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचा संशय आला. यामुळे त्याने चाचणी केली असता फुफ्फुस, रक्तात हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.'' (Green fungal infection in a 34 year old patient overcoming corona The first case in the country)

कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांमध्ये असणारा हिरवी बुरशी संसर्गाचा प्रकार इतर रुग्णांच्या तुलनेमध्ये वेगळा आहे का यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे डॉक्टर रवी दोशी यांनी म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

फुफ्फुसामध्ये 100 टक्के कोरोना संसर्ग झाला असल्याने जवळपास एक महिना त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांच्या नाकामधून रक्त वाहत होते. तसेच खूप तापही येत होता. वजन कमी झाल्याने त्यांना अशक्तपणाही जाणवत होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याची ही देशामधील पहिलीच व्यक्ती असण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईतील हिंदूजा (Hinduja Hospital) रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com