जम्मू काश्मिरात CRPF च्या तुकडीवर हल्ला, दोन जवान जखमी

बारामुल्ला जिल्ह्यातील पल्हान चौकात संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट केल्याने दोन CRPF जवान जखमी झाले आहेत
Grenade attack on CRPF soldiers in Pattan Palhalan areas  in Jammu Kashmir
Grenade attack on CRPF soldiers in Pattan Palhalan areas in Jammu Kashmir Dainik Gomantak

जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) बारामुल्ला (Baramulla) येथील पल्हालन पट्टणमध्ये (Pattan Palhalan) पुन्हा ग्रेनेड हल्ला झाला आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पल्हान चौकात संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट केल्याने दोन CRPF जवान जखमी झाले असून यात आणखीन दोन CRPF कर्मचारी आणि एक नागरिक देखील जखमी झाला आहे .याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की CRPF जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड फेकला गेला आहे. या घटनेत सीआरपीएफचे दोन जवान आणि एका नागरिकाला गोळी लागली आहे. (Grenade attack on CRPF soldiers in Pattan Palhalan areas in Jammu Kashmir)

या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असुंन उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कर समर्थित दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे कमल कोट उरी भागात जवानांनी संशयास्पद हालचाल पाहिल्यानंतर गोळीबार करण्यात आला. तिथेदेखील सैन्याने शोध मोहीम सुरू केली आहे.

Grenade attack on CRPF soldiers in Pattan Palhalan areas  in Jammu Kashmir
'महात्मा गांधी तर सत्तेचे भुकेले', कंगना पुन्हा बरळली

तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा खात्मा सुरूच आहे. अलीकडेच, श्रीनगरच्या हैदरपोरा भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या एसओजीने विशिष्ट माहितीच्या आधारे हायपेरोपोराजवळील निवासी भागाला वेढा घातला होता. येथे दोन दहशतवादी अडकल्याचे मानले जात होते,त्या दोघांनाही सुरक्षा दलांनी ठार केले आहे.अलीकडेच गुप्तचर यंत्रणांनी खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. तयार करण्यात आलेल्या 38 दहशतवाद्यांच्या यादीत 27 दहशतवादी लष्करचे असून उर्वरित 11 जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. सुरक्षा दलाने आता निवडकपणे त्यांचा खात्मा करण्यास सुरूवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com