टूलकिट प्रकरण: ग्रेटाने भारताला दिले मानवाधिकारांचे धडे; दिशा रवीचे समर्थन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

टूलकिट प्रकरणात अटक झालेल्या दिशा रवीच्या समर्थनार्थ आता पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने उडी घेतली आहे.आपल्या ट्वीटमध्ये #StandWithDishaRavi या हॅशटॅगचा वापर करून तिने दिशाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

ओस्लो : टूलकिट प्रकरणात अटक झालेल्या दिशा रवीच्या समर्थनार्थ आता पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने उडी घेतली आहे. तिने पुन्हा ट्विट करून भारताला मानवाधिकारांचा धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये #StandWithDishaRavi या हॅशटॅगचा वापर करून तिने दिशाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांची मागणी मान्य करून दिशा रवीला तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

मेट्रो संबंधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

ग्रेटा थनबर्ग हिने शुक्रवारी ट्विटर हँडलवरून ट्विट केले आणि लिहिले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण निषेध आणि जाहीर सभा घेणे हे मानवी हक्क आहेत. कोणत्याही लोकशाहीचा हा मूलभूत भाग असावा. 'फ्रायडेज् फॉर फ्यूचर' या तिच्या संस्थेचं ट्विट तिने यावेळी शेअर केलं. 'फ्रायडेज् फॉर फ्यूचर'ची स्थापना ग्रेटाने 2018 मध्ये केली होती. या ट्विटर हँडलवरून दिशा रवीच्या समर्थनार्थ अनेक ट्विट केले गेले होते, त्यानंतर आता ग्रेटानेही आवाज उठविला आहे. दिशा रवी हिला 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथून शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट' सोशल मीडियावर शेअर आणि एडिट केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. 

गोवा पर्यटकांसाठी खुशखबर! IRCTC ने दिले “EXOTIC GOA” टूर पॅकेज

ग्रेटा थनबर्ग कोण आहे?

ग्रेटा थनबर्ग ही हवामान बदलावर काम करणारी एक पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे. तिने अनेक वेळा आपल्या भाषणांसह लोकांची मने जिंकली आहेत. याव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या तिच्या ट्विटर वॉरचीही बरीच चर्चा झाली होती. डिसेंबर 2020 मध्ये, स्वीडनच्या या 16 वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीची प्रतिष्ठित टाइम मासिकाने 2019 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून निवड केली.

संबंधित बातम्या