भर मांडवातून नवरदेव फरार, नवरीने केले वऱ्हाडीतीलच युवकाशी लग्न

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

अलीकडच्या काळात तरुण तरुणींचे पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण खूपच वाढले असल्याचे आपण पहिले आहे.  मात्र भर लग्नाच्या मांडवातून जर वर किंवा वधू  पळून गेले तर, अशावेळी दोन्ही कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात तरुण तरुणींचे पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण खूपच वाढले असल्याचे आपण पहिले आहे.  मात्र भर लग्नाच्या मांडवातून जर वर किंवा वधू  पळून गेले तर, अशावेळी दोन्ही कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र अशीच एक घटना दिल्लीतून समोर आली आहे. दिल्लीतील महाराजपूर परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार,  वधू वरांचा हार घालण्याचा विधी पूर्ण झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीय मुख्य सोहळ्याची तयारी करत होते. मात्र तितक्यात वर अचानक मांडवातून गायब झाला. बराच वेळ वराचा शोध घेतल्यानंतरही तो भेटला नाही. तर दुसरीकडे आता ही बाब वधूच्या कुटुंबियांनाही माहीत झाली होती. काही काळ शोध घेतल्यानंतर वधूच्या घरातील सदस्यांना हे कळले की वर फक्त गायब झाला नाही तर जाणीवपूर्वक घटनास्थळावरून पळून गेला आहे, आणि त्याचे कारणही त्यांना कळाले होते.  (The groom ran away from the wedding ceremony, the bride married another young man) 

COVID-19 Updates: कोरोनामुळे मृत्यूचा आज पर्यंतचा सर्वात मोठा आकडा; पहा मे...

दरम्यान या सर्व गोंधळात वधूच्या कुटुंबियांचा त्रास पाहून लग्नसमारंभात आलेल्या एक योग्य मुलाशी वधूचे लग्न करावे, असा सल्ला वराच्या बाजूने आलेल्या एका पाहुण्याने दिला.  त्यानंतर वधूच्या कुटुंबीयांनी लग्नसमारंभात आलेल्या मुलांपैकी एकाची निवड केली आणि संबंधित कुटुंबांशी सल्लामसलत झाल्यानंतर त्यांच्या लग्नास परवानगी दिली. त्याच ठिकाणी  त्यांचं लग्न झालं. नंतर, वधूच्या कुटुंबीयांनी पळून जाणाऱ्या वर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. वधूच्या घरातील पोलिसांत तक्रार दाखल नरवाल पोलिस स्टेशन परिसरातील निरीक्षक शेष नारायण पांडे म्हणाले, आमच्याकडे वधू-वर दोघांकडून तक्रारी आल्या आहेत. वधू पक्षाने वर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी, फरार झालेल्या वराचे वडील धरमपाल यांनी आपल्या तक्रारीत हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेतली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

आयुर्वेदिक डॉक्टरचा कोरोनावरील खास औषधाचा दावा; दवाखान्याबाहेर लोकांची झुंबड

दरम्यान, गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील खंडवा येथील एका व्यक्तीने पाच दिवसांत दोन मुलींशी लग्न केले आणि तेव्हापासून तो गायब झाला होता.  पाच दिवसांच्या अंतरात  दोन मुलींशी लग्न करणारा 26 वर्षीय व्यक्ती इंदूरच्या मुसाखेडी भागातील असून, त्याने दोन डिसेंबर रोजी खंडवा येथील एका मुलीशी लग्न केले होते, तर, इंदूर येथील महू तहसीलमधील दुसर्‍या मुलीशी त्याने 7 डिसेंबर रोजी लग्न केले होते. अशी माहिती कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी बी.एल. मांडलोई यांनी  दिली होती.  

संबंधित बातम्या