प्रसिध्द स्क्रिप्टरायटर वरुन ग्रोव्हर याचे ट्वीट होतय चांगलच व्हायरल

 Grover tweet from a famous scriptwriter is going viral
Grover tweet from a famous scriptwriter is going viral

नवी दिल्ली:  देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत  हिंसाचार उफाळून आला. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शांतीपूर्णरित्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन चालू होते. मात्र कृषी कायद्यांच्या विरोधात काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला अचानक हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकवला. देशभरातून या हिंसक घटनेचं खंडण करण्यात येत आहेत. दरम्यान बॉलिवूडमधील लोकप्रिय पटकथाकार वरुण ग्रोवर याने ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधले.

वरुनचे ट्वीट सध्या सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे.या ट्वीटमध्ये वरूण म्हणतो, ‘’ही सगळी चूक गांधी नेहरु यांचीच आहे. ना स्वातंत्र मिळाले असते ना प्रजासत्ताक दिवस असता’’ अशा आशयाचे ट्वीट केले आहे. केंद्रसरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून विरोध होत आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश मधील शेतकरी प्रामुख्याने या अंदोलनात सहभागी आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर दिल्ली सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमावर्ती भागात ट्रक्टर रॅलीचे आयोजन केले होते. दरम्यान शेतकऱ्यांचा एक जथ्था दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या दिशेने गेला आणि त्यांनी लाल किल्ल्यावर आपला ध्वज फडकवला. तर दुसरीकडे आयकर कार्यालयाच्या जवळ ट्रक्टर उलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जवळपास दोन महिन्यानंतर दिल्लीत आल्यांनंतर हिंसक वळण लागले. याशिवाय सार्वजनिक संपत्तीचे मोठ्याप्रमाणात हानी झाली. आठ बसेस आणि 17  खाजगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. पटकथाकार वरुन ग्रोवरने नेटप्लिक्सवरील सुपरहिट सीरीज सेक्रेड गेम्स या वेबसीरीजसाठी त्याने पटकथा लेखन केले आहे. त्याचबरोबर फॅन, उडता पंजाब, या प्रसिध्द चित्रपटांमध्ये गाणी लिहिली आहेत. तसेच वरुणने' पेपर चोर' हे पुस्तक देखील लिहीले आहे.       

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com