Gujarat Election 2022: दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, पंतप्रधानांसह दिग्गज नेते बजावणार मतदानाचा अधिकार

Gujarat Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.
Gujarat Election 2022
Gujarat Election 2022Dainik Gomantak

गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी आज दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरातमध्ये (Gujrat) कोण बाजी मारणार याचा निर्णय 8 डिसेंबरला लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) , गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत. जाणून घेऊया पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह व्हीआयपी मतदार कधी मतदान करणार आहेत.

Gujarat Election 2022
India-Nepal Border Dispute: उत्तराखंडात भारत-नेपाल सीमेवर तणाव; भारतीय मजुरांवर दगडफेक
  • कोण किती जागा लढवणार?
    या टप्प्यात भाजप (BJP) सर्व 93 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवाय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सर्व 93 जागांवर लढत आहेत. काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने (BTP) 12 उमेदवार उभे केले आहेत आणि बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com