गुजरात विधिमंडळात 'लव्ह जिहाद' कायदा मंजूर; दोषी आढळल्यास इतक्या वर्षाची शिक्षा 

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 जून 2021

धर्म स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयक गुजरातच्या विधिमंडळात गदारोळात  मंजूर करण्यात आले होते.

लव्ह जिहाद कायद्याला (Love Jihad Act) गुजरातच्या राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. राज्यात हा कायदा 15 जूनपासून लागू होणार आहे. गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री विजय रुपानी (Vijay Rupani) यांनी लव्ह जिहाद विरुध्दचा निर्णय घेतला आहे. रुपानी सरकारने हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) पास केले. त्यानंतर कायद्याच्या मंजुरीसाठी राज्यापाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) यांच्याकडे पाठवण्यात आले होते. धर्मांतर थांबवणे आणि हिंदू मुलींचे अपहरण रोखण्यासाठी आपले सरकार लव्ह जिहाद विरु्ध्द कायदा करेल, असे मुख्यमंत्री रुपानी यांनी आपल्या एका निवडणूक प्रचारसभेत सांगितले होते. त्यानंतर धर्म स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयक गुजरातच्या विधिमंडळात गदारोळात  मंजूर करण्यात आले होते. (Gujarat Legislature approves Love Jihad Act So many years of imprisonment if found guilty)

''...अंमलबजावणी न झाल्यास'', केंद्र सरकारचा Twitter ला...

10 वर्षाची शिक्षा...
लव्ह जिहाद विधेयक मंजूरी मिळाल्यानंतर आता आमिष दाखवून, जबरदस्ती, किंवा विवाहाच्या माध्यमातून धर्मांतरण करण्यास भाग पाडणं यापुढे गुन्हा असणार आहे. या कायद्यांतर्गत आता दोषी आढळणाऱ्या आरोपीला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. धर्म लपवून लग्न केल्यास 5 वर्षांची शिक्षा आणि दोन लाखांचा दंडही ठोठाण्यात आला आहे. तर अल्पवयीन मुलीशी लग्न केल्यास 7 वर्षाचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपये दंडाची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 3 लाखांचा दंड आणि 7 वर्षाची शिक्षा असणार आहे.

धर्मांतर करण्याच्या हेतूने एखाद्या महिलेशी विवाह करुन तिची फसवणूक रोखण्यासाठी हा कायदा विधिमंडळात संमत करण्यात आला आहे. या विधेयकात 2003 कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यात जबरदस्तीने प्रलोभन देऊन धर्मांतरण करण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद आहे.

संबंधित बातम्या