Gujarat Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेला जबाबदार कोण? ओरेवा ग्रुपच्या एमडीला अटक; तपास सुरु

Gujarat Police: गुजरातमधील मोरबी येथे गेल्या वर्षी झालेल्या पूल दुर्घटनेनंतर आता गुजरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Gujarat Morbi Bridge Collapse
Gujarat Morbi Bridge CollapseDainik Gomantak

Gujarat Morbi Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी येथे गेल्या वर्षी झालेल्या पूल दुर्घटनेनंतर आता गुजरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या अपघातात जवळपास 135 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आता पुलाचे नूतनीकरण, संचालन आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान, गुजरात पोलिसांनी रविवारी अजंता ओरेवा ग्रुपचे प्रवर्तक जयसुख पटेल यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. पोलिसांनी जयसुख पटेलविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली आहे. या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी जयसुख पटेल यांची अजंता ओरेवा ही कंपनी असल्याचे सांगितले जात आहे. लुकआउट सर्कुल जारी झाल्यानंतर आता ओरेवा ग्रुपचे एमडी लवकरच पोलिसांच्या (Police) तावडीत येण्याची शक्यता आहे.

Gujarat Morbi Bridge Collapse
Gujarat Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेबाबत PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला

याआधी, 16 जानेवारी रोजी जयसुख पटेल यांनी अटक टाळण्यासाठी मोरबी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. शनिवारी न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी 1 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी मोरबी शहरातील मच्छू नदीवरील हा पूल कोसळला होता. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

तसेच, ओरेवा ग्रुपने मोरबी नगरपालिकेसोबत करार केला होता, त्यानुसार या पुलाचे कामकाज आणि दुरुस्ती या कंपनीकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. हा करार 15 वर्षांसाठी करण्यात आला होता. मार्च 2022 मध्ये मोरबी नगरपालिका आणि अजंता ओरेवा कंपनी यांच्यात हा करार झाला होता, जो 2037 पर्यंत वैध होता.

Gujarat Morbi Bridge Collapse
Gujarat Morbi Bridge Collapse: 'मोरबी दुर्घटनेला गुजरात सरकार जबाबदार'

अजंता ओरेवा ग्रुपवर निष्काळजीपणाचा आरोप

मोरबी पुलावरील भीषण अपघातानंतर फॉरेन्सिक पथकाच्या तपासणी अहवालात पुलाच्या दुरुस्तीदरम्यान जुन्या गंजलेल्या केबल्स, तुटलेल्या अँकर पिन आणि लूज बोल्टसारख्या त्रुटींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे समोर आले होते. हा पूल जनतेसाठी खुला करण्यापूर्वी कंपनीने या पुलावर किती भार पडू शकतो हे तपासण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची मदतही घेतली नसल्याचेही कळते.

दुसरीकडे, मोरबी दुर्घटनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने पुलाच्या दुरुस्तीबाबत अजंता ओरेवा ग्रुपने केलेल्या अनेक त्रुटींचा पर्दाफाश केला होता. मोरबी पुलावर हा अपघात झाला तेव्हा त्यावर 300 ते 400 लोक होते, असे सांगण्यात येते. पूल कोसळल्याने अनेक जण नदीत पडले.

Gujarat Morbi Bridge Collapse
Morbi Bridge Collapse: मोरबी दुर्घटनेवर चीनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची प्रतिक्रीया, म्हणाले...

अपघातानंतर एकच हल्लकल्लोळ उडाला. बचाव पथकाने अनेक दिवस बचावकार्य केले. या दुर्घटनेनंतर कोणतीही मोठी कारवाई न केल्याने राज्यातील भाजप (BJP) सरकार सातत्याने विरोधकांच्या निशाण्यावर होते. या अपघाताचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com