
वडोदरा स्थित महाराजा सयाजीराव विद्यापीठातील ललित कला विद्याशाखेतील एका प्रदर्शनावरुन मोठा गोंधळ उडाला आहे. विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी हिंदू देवी-देवतांची आक्षेपार्ह फोटो प्रदर्शित केले आहेत. ज्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यावर आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आक्षेप घेत डीनच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ललित कला विद्याशाखेच्या वार्षिक चित्रकला प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी (Students) विविध विषयांवर कलाकृती तयार केल्या होत्या. मात्र, त्यातील काही कलाकृतींमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांनी हिंदू देवी-देवतांचे फोटो बनवण्यासाठी कटआउट्सचा वापर केला, तर काहींनी नग्न फोटो काढले. वृत्तपत्रांचा वापर कट आऊट्ससह कलाकृती करण्यासाठी केला जात होता. मात्र, असे पोर्ट्रेट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बातम्या बलात्काराच्या होत्या. ज्याने या संतापाला अधिक भडकवलं.
दुसरीकडे, अभाविपचे कार्यकर्ते प्रदर्शनात पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी करत डीनच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांची योग्य ती चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात डीन आणि कुलगुरुंना अर्जही दिला.
तसेच, कुलगुरुंना लिहिलेल्या पत्रात, एबीव्हीपीने म्हटले आहे की, ''हिंदू देवी-देवतांचे फोटो तयार करण्यासाठी बलात्काराच्या बातम्यांच्या क्लिपिंगचा वापर करणे ही लाजिरवाणी बाब आहे. हिंदूं देवी-देवतांच्या फोटोंमागे बलात्काराच्या बातम्या जोडल्या जातात, हे निंदनीय आहे.''
ABVP चे VC, MSU यांना पत्र
यापूर्वीही ललित कला विद्याशाखेने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह कलाकृती मांडल्या होत्या.
ओपी इंडियाशी बोलताना, ABVP नेते वज्र भट्ट म्हणाले की, ''ललित कला विद्याशाखेतील प्रदर्शनासाठी मांडण्यात आलेल्या काही कलाकृती हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या होत्या. कारण या प्रदर्शनात हिंदू देवी-देवतांचे फोटो वृत्तपत्रातील क्लिपिंग्जमधून बनवण्यात आले होते. बलात्काराच्या मुद्द्यांवर बोलायचे असेल आणि हायलाइट करायचे असेल तर ठीक आहे, परंतु हिंदू देव-देवतांना यामध्ये का ओढायचे? म्हणूनच आम्ही डीनला रस्टीकेट करण्याची मागणी करत आहोत.'' दुसरीकडे, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन विद्यापीठाने दिले आहे.
एबीव्हीपीने एका निवेदनात म्हटले आहे की, ''कलेच्या नावाखाली हिंदू देवी-देवतांच्या फोटोंचे जाणीवपूर्वक विकृतीकरण केलं जात आहे. त्याचबरोबर देव-देवतांचा अपमानही केला जात आहे. शिवाय भारताची (India) शान असलेल्या अशोक स्तंभाचेही विद्रुपीकरण करण्यात आले आहे.'' त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी अभाविपने केली आहे.
तथापि, फॅकल्टी डीन जयराम पोडवाल यांनी दावा केला आहे की, ''व्हायरल झालेले फोटो एमएसयूचे नाहीत आणि असे फोटो विद्यापीठात (University) प्रदर्शित केले जात नाहीत.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.