Gujrat Murder Case : धक्कादायक! उपचारासाठी गेलेल्या माय-लेकीचा दुर्दैवी अंत; ऑपरेशन थिएटरमध्ये आढळला मृतदेह

गुजरातमधील अहमदाबादमधील रुग्णालयात आई आणि मुलीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Gujrat Murder Case | Ahmedabad Murder Case
Gujrat Murder Case | Ahmedabad Murder CaseDainik Gomantak

Ahmedabad Murder Case: गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच रुग्णालयात आई आणि मुलीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आधी मुलीचा मृतदेह ऑपरेशन थिएटरच्या वॉर्डरोबमध्ये आणि नंतर आईचा मृतदेह बेडखाली सापडला. अहमदाबाद येथील कागदपीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत भुलाभाई पार्कजवळ हे रुग्णालय आहे.

Gujrat Murder Case | Ahmedabad Murder Case
Covid-19 BF.7 Variant : कोविडसाठी नवी योजना; आरोग्यमंत्री मनसुख मांडविया घेणार राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक

या प्रकरणाबाबत एसीपी मिलाप पटेल यांनी सांगितले की, आई-मुलगी उपचारासाठी रुग्णालयात आल्या होत्या आणि आता या रुग्णालयातून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. वास्तविक, ऑपरेशन थिएटरमध्ये सतत दुर्गंधी येत असताना, तपास केला असता, मुलीचा मृतदेह प्रथम कपाटात आढळून आला, पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी आईचा शोध सुरू केला, त्यानंतर पलंगाखाली आणखी एक मृतदेह सापडला जो तिच्या आईचा होता.

दुर्गंधीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संशय आला

पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी रुग्णालयात काम करणाऱ्या मनसुख या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील कागदपीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुलाभाई पार्कजवळील हॉस्पिटलमधून दुर्गंधी येत होती. पोलिसांना याची माहिती मिळताच तपासात दोघांच्या हत्येचा खुलासा झाला.

मुलगी 30 वर्षांची होती, तिचा मृतदेह रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ठेवलेल्या कपाटात सापडला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा होईल. रूग्णालयात असा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचीही सातत्याने चौकशी केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com