Gujrat: गुजरातमधील काँग्रेसच्या सात आमदारांची मत द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने

cross vote: क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसची चिंता वाढली
Gujrat congress
Gujrat congressDainik Gomantak

Congress: देशाचा राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत गुजरातमधील काँग्रेसच्या सात आमदारांनी द्रौपदी मुर्मूच्या बाजूने मतदान केले. पक्षाचा व्हिप डावलून एनडीएच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या आमदारांचा शोध घेण्यात काँग्रेसला आतापर्यंत अपयश आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना हा प्रकार घडला आहे या वर्षाच्या शेवटी गुजरात मध्ये विधानसभा निवडणीका होणार आहेत.

त्यामुळे उशिरा का होईना हे आमदार भाजपमध्ये जातील, अशी भीती पक्षाला वाटू लागली आहे. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसची चिंता तर वाढलीच शिवाय आम्ही भाजपला कडवी टक्कर देऊ, असा पक्षाचा दावाही फसला आहे.

Gujrat congress
Ram Nath Kovind यांचा संसद भवनात निरोप समारंभ; पंतप्रधान, उपराष्ट्रपतींसह सर्व खासदारांची उपस्थिती

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर म्हणाले की, ज्या आमदारांनी क्रॉस व्होट केले त्यांच्याविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही, कारण त्यांची ओळख पटवली नाही. “सध्या कोणतीही कारवाई होत नाही. क्रॉस व्होटिंग केलेले आमदार उशिरा का होईना भाजपशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असे ठाकोर यांनी एक दिवसापूर्वीच सांगितले होते. आता त्यांचा सूर बदलला आहे.

Gujrat congress
Uttarakhand: स्थलांतर रोखण्यासाठी उत्तराखंड सरकारचा मेगा प्लॅन

गुरुवारी मतमोजणी झाली तेव्हा काँग्रेसचे ६३ आमदार आणि ५७ आमदारांनी एकमेव अपक्ष आमदाराच्या पाठिंब्यानंतरही यशवंत सिन्हा यांच्या बाजूने मतदान केले. त्याचवेळी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 121 मते मिळाली. तर विधानसभेत भाजपचे 111 आमदार आहेत. याचा अर्थ मुर्मू यांना 10 अधिक मते मिळाली, तर यशवंत सिन्हा यांना अपेक्षेपेक्षा सात मते कमी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com