Bihar : पोलिसही घाबरले! खून होणार म्हणत, पोलिसांसमोरच झाल्या तीन हत्या

या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bihar
BiharDainik Gomantak

पाटणा येथील फतुहा येथे पार्किंगवरून वाद झाला होता. फेब्रुवारी महिन्यात जेठुली गावात भीषण गोळीबार झाला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात पाच जणांना गोळी लागली. दरम्यान, या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांसमोरच हा प्रकार घडत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. घटना घडली त्यावेळी पोलिस देखील घाबरून मागे सरल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये एक पोलिस आता खून होणार असल्याचे बोलताना स्पष्टपणे ऐकू येत आहे.

Bihar
Karnataka Election: काँग्रेस काळात लाईट नसल्यामुळे लोकसंख्या वाढली, भाजप मंत्र्यांचे वक्तव्य

गेल्या महिन्यात नदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेठुली गावात गोळीबाराची घटना घडली होती. कार पार्किंगच्या वादातून गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, नंतर जमीन वादाचा मुद्दाही समोर आला. येथे माजी पंचायत प्रतिनिधी टुनटुन यादव आणि जेठुली पंचायतीचे मुख्य प्रतिनिधी सतीश यादव उर्फ ​​बच्चा राय यांच्यात वाद झाला.

दरम्यान, बच्चा राय यांच्या चालकाने गोळीबार केला. या घटनेत पाच जणांना गोळ्या लागल्या. गोळी लागल्याने गौतम कुमारचा जागीच मृत्यू झाला. तर रोशन कुमार आणि मुंद्रिका राय यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेच्या वेळी 50 हून अधिक राउंड गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपींचे घर, लग्नमंडप आणि अनेक वाहने पेटवून दिली. ग्रामस्थांचा रोष पाहता जिल्हा प्रशासनाने येथे 144 कलम लागू केले होते. अनेक दिवसांपासून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान या प्रकरणावरून राजकारण देखील झाले. पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. या घटनेशी संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर पाटणा पोलिसांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com