गुरमित राम रहिम आजारी आईला भेटण्यासाठी पॅरोलवर तुरूंगातून बाहेर

गुरमित राम रहिम आजारी आईला भेटण्यासाठी पॅरोलवर तुरूंगातून बाहेर
Gurmit Ram Rahim out of jail for one day to meet his mother

चंडीगड/रोहतक : लैंगिक शोषण आणि हत्याप्रकरणी वीस वर्षाची शिक्षा भोगणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा एक दिवसाच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आल्याची माहिती उघडकीस आली. 

२४ ऑक्टोबर रोजी आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी त्याला पॅरोल देण्यात आला होता, असे आज स्पष्ट झाले. राम रहिम याच्या पॅरोलची भणक सरकार आणि तुरुंग प्रशासनाने कोणालाही लागू दिली नाही. पॅरोल मिळाल्यानंतर राम रहिम हा गुडगावच्या एका दवाखान्यात उपचार घेणाऱ्या आईला भेटण्यासाठी आला. त्यास सुनारिया तुरुंगातून गुडगावच्या रुग्णालयापर्यंत बंदिस्त वाहनातून आणले आणि परत तुरुंगात 
नेले. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com