Gurugram Viral News: गुरुग्रामच्या रस्त्यावर नग्न होऊन धावला विदेशी तरुण

तरुणाला वैद्यकीय तपासणीसाठी सेक्टर 10 येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
Gurugram Viral News
Gurugram Viral Newsdainik gomantak

Gurugram Viral News: गुरुग्राममध्ये एक व्यक्ती नग्नावस्थेत रस्त्यावरून धावू लागला. विदेशी असलेल्या या तरूणाला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, ही घटना सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये एक व्यक्ती नग्नावस्थेत रस्त्यावरून धावू लागल्याने लोक आश्चर्यचकीत झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला वैद्यकीय तपासणीसाठी सेक्टर 10 येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

बादशाहपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मदन लाल यांनी सांगितले की, जर त्याची मानसिक स्थिती स्थिर असल्याचे आढळून आले तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com