भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे झाले नामांतर, जाणून घ्या

भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे (Habibganj Railway Station) नाव बदलण्याच्या मागणीला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी होकार दिला आहे.
भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे झाले नामांतर, जाणून घ्या
Habibganj Railway StationDainik Gomantak

भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे (Habibganj Railway Station) नाव बदलण्याच्या मागणीला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी होकार दिला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिले होते. ज्यावर भारत सरकारने कोणताही आक्षेप व्यक्त केलेला नाही. भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह अन्य नेत्यांनी हबीबगंज स्टेशनला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचे नाव देण्याची मागणी केली होती.

Habibganj Railway Station
केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीतील शाळा आठवडाभरासाठी बंद !

आधुनिक विमानतळासारख्या सुविधांनी बांधलेले हे स्थानक, रेल्वे स्थानकाच्या बदललेल्या नावाने 15 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी जनतेला समर्पित करणार आहेत. आदिवासी प्रतिक आणि स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "आदिवासी गौरव दिना" रोजी पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशच्या राजधानीला भेट देणार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com