हल्याळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचाच झेंडा

Dainik Gomantak
गुरुवार, 25 जून 2020

श्रीनिवास घोटणेकर यांनी  संचालकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांसाठी केलेल्या विकास  कामामुळे आज ही विजयाची माळ श्रीनिवास यांच्या गळ्यात पडली आहे

संताेष पाटील
हल्याळ

कारवार जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या  हल्याळ -दांडेली-जोयडा व्याप्तीतील  हल्याळ  कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अंतिम २० महिन्याच्या कालावधी साठी झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी चुरशीच्या लढतीत काँग्रेस प्रणीत उमेदवार युवा नेते  श्रीनिवास घोटणेकर यांनी भाजप प्रणीत पुरस्कृत उमेदवार सोनप्पा सुनकार यांचा १ मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळवला. उपाध्यक्ष पदाच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेस प्रणीत उमेदवार  संतोष मिराशी यांनी भाजप प्रणित महिला उमेदवार गीता मोरी यांचा १ मतांनी पराभव करता  विजयश्री खेचत  कृषि उत्पन्न बाजार समिति वर. पुनः एकदा कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकावला   
यावेळी वरिष्ठ कांग्रेस नेते अणि  कारवार जिल्हा विधानपरिषद सदस्य एस.एल .घोटणेकर यानी सांगितले ,आजच्या चुरशीच्या  निवडणुकीत  श्रीनिवास घोटणेकर यांनी  संचालकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांसाठी केलेल्या विकास  कामामुळे आज ही विजयाची माळ श्रीनिवास यांच्या गळ्यात पडली आहे त्याबद्दल आपण काँग्रेस कार्यकर्ते , नेते ,यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत.  बंदोबस्त बजावलेल्या पोलीस विभाग  निवडणूक अधिकारी विद्याधर गुळगुळी यांचे आभार. उद्यापासून होणाऱ्या जिल्ह्यातील  दहावीच्या परीक्षेसाठी विध्यार्थ्यांना शुभेच्छा. 
यावेळी संजू मिशाळी, बाबू पागोजी एल. एस आर्षेणगिरी, मादप्पा गौडा, तुकाराम गौडा  सलाम दलाल बाळकृष्ण शहापूरकर, नगरसेवक नविन काटकर , अनिल चव्हाण  ,अप्पाराव पुजारी  यलप्पा मालवणकर ,सुंदर कंकात्री, अशोक होमनल्ली,  रामचंद्र तंबिटकरा  मारुती तोरस्कर, गणपती बेकन  नागराज पाटील  रवी तोरनगट्टी , सिकंदर मुल्ला दांडेली येथील सुरजित सिंग राठोड , श्रीकांत गवस उपस्थित होते .

संबंधित बातम्या