Har Ghar Tiranga: PM मोदींनी देशवासीयांना केले डीपी बदलण्याचे आवाहन

Har Ghar Tiranga: केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत या महिन्यात तीन दिवस देशभरातील 20 कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे.
Har Ghar Tiranga| PM Modi
Har Ghar Tiranga| PM ModiDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे 'प्रोफाइल' फोटो बदलून डीपीवर तिरंगा लावला आहे. खरं तर, आकाशवाणीच्या 'मन की बात' च्या 91 व्या आवृत्तीत देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेचा उल्लेख केला होता. त्यात त्यांनी लोकांना त्यांच्या सोशल मीडिया 'प्रोफाइल' फोटोवर 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा ठेवण्याचे आवाहन केले आहे. मोंदीनी आज म्हणजेच 2 ऑगस्टला तिरंगा आपल्या 'प्रोफाइल' फोटोला ठेवला आहे.

या प्रसंगी पंतप्रधानांनी एक ट्विट (Tweet) देखील केले आणि लिहिले की, "आज 2 ऑगस्टचा दिवस खास आहे! ज्या वेळी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा आपले देश #HarGharTiranga साठी तयार आहे. मी माझ्या सोशल मीडिया (Social Media) पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांना तेच करण्याची विनंती करतो."

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा 'प्रोफाइल' फोटो म्हणून वापर करण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी जनतेला 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga Campaign) मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आझादी' अमृत महोत्सव एक जनआंदोलन बनला आहे आणि लोकांनी 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून तिरंगा लावण्याचे आवाहन केल्यानंतर शहा यांचे हे आवाहन आले आहे.

केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत या महिन्यात तीन दिवस देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. कार्यक्रमांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत लोकसहभागातून घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून सरकारी आणि खाजगी आस्थापनेही यात सहभागी होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com