मोदी स्टेडियमवरुन हार्दीक पटेंलचा भाजपवर हल्लाबोल

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर निर्बंध घातले होते. त्यामुळेच आरएसएसचे चेले त्यांचं नाव हाटवण्याचा प्रयत्न करत आहेत

अहमदाबाद: जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून नावलौकीक असणाऱ्या गुजरातमधील मोटेरा स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम देण्यात आल्य़ानंतर भाजप आणि कॉंग्रेस याच्यांत शाब्दीक चकमकी सुरु झाल्या. या स्टेडियमला पूर्वीचे नाव सरदार वल्लभभाई पटेल होते. ते आता बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद करण्यात आले. आणि त्यानंतर देशातील राजकारण तापायला सुरुवात झाली. सरदार पटेलांचे नाव हटवल्यानंतर गुजरातमधील कॉंग्रेस नेते हार्दीक पटेल यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्यावर कडाडून टिका केली.

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यामुळे कॉंग्रेस बॅकफूटवर

''सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर निर्बंध घातले होते. त्यामुळेच आरएसएसचे चेले त्यांचं नाव हाटवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात हार्दीक पटेलांनी निशाणा साधला. सरादार पटेलांचा अपमान देश सहन करणार नाही असा इशाराही हार्दीक पटेलांनी दिला. मनातून द्वेष कराय़चा आणि तोंडावर गोड बोलायचे असंच वर्तन भारतीय जनता पक्षाचे राहिले आहे. मात्र हे लक्षात ठेवा सरदारांचा हा अपमान भारत सहन करणार नाही,'' अशा आशयाचे ट्वीट हार्दीक यांनी केले आहे.  

 

संबंधित बातम्या