''मी काँग्रेसमध्येच आहे, पक्षासाठी काम करतोय'': हार्दिक पटेल

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने (Hardik Patel) आपण काँग्रेस सोडत असल्याची अटकळ फेटाळून लावली आहे.
Hardik Patel
Hardik PatelDainik Gomantak

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने आपण काँग्रेस सोडत असल्याची अटकळ फेटाळून लावली आहे. हार्दिक म्हणाला की, अफवा हा राजकारणाचा भाग आहे. मात्र, राज्यातील पक्षाशी संबंधित बाबींमध्ये माझा आवाज ऐकला जाईल, अशी मला आशा आहे. (Hardik Patel has said that he is not leaving the Congress)

माध्यमाशी बोलताना हार्दिकने सर्व मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. ट्विटरवरील त्याच्या प्रोफाइलमध्ये कार्याध्यक्षाऐवजी 'प्राउड इंडियन देशभक्त, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, उत्तम भारतासाठी वचनबद्ध' असे लिहिल्याबद्दल आपली नाराजी पक्षाशी जोडल्याच्या प्रश्नावर हार्दिक म्हणाला, 'मी जे काही लिहिले आहे, त्यावर माझा विश्वास आहे. त्याऐवजी देशावर चर्चा करायची का? मी काँग्रेस (Congress) पक्षाचा कार्यकर्ता आहे.'

Hardik Patel
हार्दिक पटेल सोडणार काँग्रेस? ट्विटर बायोमधून हटवले पक्षाचे नाव

दरम्यान, अलीकडे तुमच्या पक्षात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या, या प्रश्नावर हार्दिक म्हणाला, 'सध्या आम्ही पक्षासाठी राज्यात काम करत आहोत. पक्षाच्या विस्तारासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी आम्ही गावोगाव फिरत आहोत. लोकांमध्ये सतत नवीन आशा निर्माण करण्यासाठी आणि त्या अपेक्षेनुसार जगण्यासाठी जे काम केले पाहिजे ते आम्ही करत आहोत. आदिवासी (Tribal) समाजासाठी रॅली काढून त्यांच्यामध्ये जागृती वाढवण्याचाही प्रयत्न करत आहोत.'

हार्दिक पुढे म्हणाला, 'आदिवासी समाज नेहमीच काँग्रेससोबत राहिला आहे. जेव्हा आम्ही आदिवासी समाजात रॅलीसाठी जातो तेव्हा मोठ्या संख्येने लोक येतात. आदिवासी समाज काँग्रेससोबत आहे. राहुलजी खूप व्यस्त आहेत, त्यांच्याशी बोलता आले नाही, ते ज्यावेळी फ्री असतील तेव्हा गुजरातच्या (Gujarat) मुद्द्यावर चर्चा करु.'

Hardik Patel
हार्दिक पटेल कॉंग्रेसवर नाराज? आपकडून ऑफर

हार्दिक पुढे म्हणाला, आम्ही कोणतेही पद घेण्याबाबत कधीही बोललो नाही. माझ्याकडे जे पद आहे ते तुम्ही घ्या, आम्हाला काम द्या, ज्यामध्ये गुजरातमध्ये नवी आशा निर्माण करता येईल. आजपर्यंत मी पक्षाकडून कोणत्याही लाभाची अपेक्षा केली नाही ही वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे जे काही होतं ते पक्षाला देण्याचं काम केलं.

शेवटी हार्दिक म्हणाला, 'माझा मुद्दा असा आहे की, तुम्ही मला कार्यवाहक अध्यक्षपदी ठेवलं नाही तरी अडचण नाही, पण माझी जबाबदारी निश्चित करा.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com