Corona Virus : हरियाणात कोरोनाचा उच्छाद; 78 जणांना कोरोनानं ओढळं जाळ्यात

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 2 मार्च 2021

हरियाणाच्या करनाल येथे 78 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

हरियाणाच्या करनाल येथे 78 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यातील 54 जण हे विद्यार्थी आहेत. मात्र त्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. हरियाणातील सैनिक स्कूलचे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण शाळेला कॅंटोन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर 78 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आरोग्य विभाग चिंतेत पडला आहे.

चहाच्या मळ्यात प्रियंका गांधी; मतदारांची जिंकली मने

हरियाणामधील करनालमध्ये आज एकाच दिवशी  78 जणांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याचे आढळले. व यातील 54 प्रकरणे ही कुंजपुरा येथील सैनिक शाळेलतील आहेत. त्यामुळे सहा महिन्यांच्या कालावधी नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. कुंजपुरा येथील सैनिकी स्कुलच्या विद्यार्थ्यांचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर आरोग्य विभागाने शाळेला सॅनिटाईझ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय या शाळेतील शिक्षकांची देखील कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

जम्मू-काश्मीर: कॉग्रेस कार्यकर्त्यांनी का जाळला गुलाम नबी आझादांचा पुतळा?

दरम्यान, काल कुंजपुरा येथे तीन विद्यार्थ्यांसह 21 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संशयित म्हणून  2,20,538 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी 2,06,924 जणांचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे. याव्यतिरिक्त, कुंजपुरा येथील जाहीर करण्यात आलेल्या कॅंटोन्मेंट झोन मधील सर्वांचे स्क्रिनींग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.         

संबंधित बातम्या