“कोव्हॅक्सिन”ची लस घेतल्यानंतर 'कोरोना'ची लागण झालेल्या हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांचे निवेदन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 डिसेंबर 2020

भारत बायोटेकची कोरोना लस “कोव्हॅक्सिन” चा पहिला ट्रायल डोस घेतल्यानंतर कोरोना चा लागण झालेले हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी आज एक निवेदन जारी केले आहे.

अंबाला :  भारत बायोटेकची कोरोना लस “कोव्हॅक्सिन” चा पहिला ट्रायल डोस घेतल्यानंतर कोरोना चा लागण झालेले हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी  “डॉक्टरांनी मला  सांगितले होते की, दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जाईल, त्यानंतर १४ दिवसांनी अॅन्टीबॉडी तयार होतील, मला पहिला डोस घेऊन फक्त १४ दिवस झाले आहेत” असं म्हटलं आहे.

 

आरोग्यमंत्री अनिल वीज (वय ६७) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशी माहिती त्यांनी शनिवारी ट्विट करुन दिली होती. वीज यांनी अंबालातील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. जे लोक संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही वीज यांनी ट्विटमध्ये केले आहे. गृह मंत्रालयाबरोबरच वीज हे राज्याचे आरोग्य मंत्रीही आहेत. त्यांना  कोव्हॅक्सिन लसीचा डोस चाचणी म्हणून अंबाला येथील रुग्णालयात २० नोव्हेंबरला देण्यात आला होता. कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारत बायोटेक करीत असून त्यासाठी लस टोचून घेणारे वीज हे पहिले स्वयंसेवक आहेत. 

संबंधित बातम्या