हाथरस प्रकरण उच्च न्यायालयालाच हाताळू द्यावे; सर्वोच्च न्यायालयाचे मत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

 सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याप्रकरणाची सुनावणी पार पडली. आता हे प्रकरण उच्च न्यायालयासच हाताळू द्या, तिथे काही झाले तर आम्ही येथे बसलेलो आहोतच, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

नवी दिल्ली-  हाथरस बलात्कार प्रकरणाचा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयास हाताळू द्या, असे मत सर्वोच्च न्यायालयाने आज मांडले. 

उत्तरप्रदेश सरकारनेच याआधी या प्रकरणाचा तपास दडपण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे तिथे या प्रकरणाची निष्पक्ष सुनावणी होणे शक्य नाही असे या याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

 सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याप्रकरणाची सुनावणी पार पडली. आता हे प्रकरण उच्च न्यायालयासच हाताळू द्या, तिथे काही झाले तर आम्ही येथे बसलेलो आहोतच, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. आजच्या या सुनावणीला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे, इंदिरा जयसिंह आणि सिद्धार्थ लुथरा आदी मंडळी उपस्थित होती.

सीबीआयला फुटेज मिळाले नाही
या प्रकरणाच्या चौकशीला आज मोठा धक्का बसला. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा निष्काळजीपणा यामुळे तपास वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ज्या रुग्णालयात पीडितेवर उपचार करण्यात आले होते त्याला भेट दिली पण रुग्णालयाच्या प्रशासनाकडे त्या दिवशीचे व्हिडिओच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. 
 

संबंधित बातम्या