Hazaribagh बस दुर्घटनेवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केला शोक

Hazaribagh Bus Accident: झारखंडमधील हजारीबाग येथील तातीझारिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिवाने नदीच्या पुलाजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे.
Accident
AccidentDainik Gomantak

Hazaribagh Bus Accident: झारखंडमधील हजारीबाग येथील तातीझारिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिवाने नदीच्या पुलाजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये 60 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस गिरिडीहहून रांचीला जात होती. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे.

सीएम सोरेन यांनी शोक व्यक्त केला

या अपघातावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, "तातीझरिया येथील पुलावरुन बस पडल्याने काही प्रवाशांचा मृत्यू तर काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. मलाही खूप दुःख झाले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जिल्हा प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.''

Accident
'Amanatullah Khan ने माझ्या घरी पैसे अन् शस्त्रे ठेवली,' हमीद अलीची ACB समोर कबुली

मृतांची संख्या वाढू शकते

आत्तापर्यंतच्या अपडेटनुसार, हजारीबाग बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 6 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रिम्समध्ये पाठवण्याची तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com