‘ते देशाचे पंतप्रधान; काहीही बोलतील’

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

‘‘ते देशाचे पंतप्रधान आहेत. ते काहीही बोलू शकतात. त्यांनी माझ्यावर केलेल्या टीकेवर मी काही बोलणार नाही. पण बिहारमध्ये आले असताना ते राज्यासाठी विशेष आर्थिक मदत, बेरोजगारी आणि उपासमारीवर या विषंयावर बोलतील अशी जनतेला अपेक्षा होती,’’ अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी मोदी यांच्या वक्तव्याला गुरुवारी उत्तर दिले.

पाटणा :‘‘ते देशाचे पंतप्रधान आहेत. ते काहीही बोलू शकतात. त्यांनी माझ्यावर केलेल्या टीकेवर मी काही बोलणार नाही. पण बिहारमध्ये आले असताना ते राज्यासाठी विशेष आर्थिक मदत, बेरोजगारी आणि उपासमारीवर या विषंयावर बोलतील अशी जनतेला अपेक्षा होती,’’ अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी मोदी यांच्या वक्तव्याला गुरुवारी उत्तर दिले.

मोदी यांनी तेजस्वी यांना ‘जंगल राजचा युवराज’ असे संबोधले होते. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उद्देशून ‘यांची औकात राहिली नाही,’ असे म्हटले होते. तो धागा पकडून ‘भाजप नेत्यांनी वैयक्तिक टीकेपेक्षा बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा स्थानिक समस्यांवर बोलावे,’ अशी अपेक्षा पकडून तेजस्वी यांनी व्यक्त केली.

पूर्ण बहुमताचा आरजेडीचा दावा
बिहारच्या जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत ‘आरजेडी’ला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा दावा तेजस्वी यादव केला. बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सर्व जाती-धर्म आणि वर्गाच्या लोकांनी आम्हाला मतदान केले असल्याचे ते म्हणाले.

संबंधित बातम्या