बेवफा प्रेयसीच्या आठवणीत त्याने सुरु केले 'बेवफा चायवाला' 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 22 मार्च 2021

प्रेमात धोका मिळालेल्या अनेकांना आपण देवदास बनलेले पहिले आहे. तर काहींना आत्महत्या करतानाही पहिले आहे. मात्र प्रेमात धोका मिळाल्यानंतर कोणत्या प्रियकराला आपल्या प्रेयसीचे ब्रॅण्डिंग करताना पहिले आहे का?

प्रेमात धोका मिळालेल्या अनेकांना आपण देवदास बनलेले पहिले आहे. तर काहींना आत्महत्या करतानाही पहिले आहे. मात्र प्रेमात धोका मिळाल्यानंतर कोणत्या प्रियकराला आपल्या प्रेयसीचे ब्रॅण्डिंग करताना पहिले आहे का? नाही ना. पण असे घडले आहे. प्रेमात धोका मिळालेल्या एका प्रियकराने आपल्या कपटी प्रेयसीच्या आठवणीत बिहार मधील पटना याठिकाणी 'बेवफा चायवाला' या नावाने चहाचे दुकान सुरु केले आहे. संदीप कुमार असे या प्रियकराचे नाव आहे. पटनाच्या व्यस्त बोरिंग कॅनाल रस्त्यावर संदीपने  हे बेवफा चायवाला' नावाने दुकान सुरु केले आहे. प्रेम आणि व्यभिचाराचा हा चहा पिण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर संदीप आपल्या मित्रांसमवेत मिळून 'बेवफा चायवाला'च्या (Bewafa Chaywala) अनेक शाखाही सुरु करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.  

मद्यप्राशन करण्यासंदर्भात दिल्ली सरकारने जारी केली नवी नियमावली 

याशिवाय, (He started Bewafa Chaywala in memory of his unfaithful) संदीप कुमारने सुरु केलेल्या 'बेवफा चायवाला' या दुकानाची विशेष बाब म्हणजे याठिकाणी रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या प्रेमी जोडप्यांपासून ते प्रेमात धोका मिळालेल्या तरुणांसाठी वेगवेगळ्या किमतीत चहा उपलब्ध आहे. त्यामुळे चहाच्या दुकानातील हा प्रयोग काहीसा वेगळाच आहे. यात चहा विक्रेत्याच्या खासगी आयुष्यातील भावनाही समाविष्ट आहेत. इथे प्रेमात धोका मिळालेल्या लोकांकडून चहासाठी 10 रुपये, तर प्रेमी जोडप्यांकडून चहासाठी 15 रुपये आकारले जातात. मातीच्या कुल्हडमध्ये हा चहा पिण्यास दिला जातो. वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळ्या किमती आकारल्या जात असल्या तरी ग्राहक इथे आवर्जून चहा प्यायला येतात. तसेच त्या दुकानाच्या नावामागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतात. बेवफा चायवाला हे दुकान जवळपास दोन महिन्यांपासून सुरू आहे.

Assam Election : ''काँग्रेस व एआययूडीएफ सत्तेत आल्यास राज्यातील...

या 'बेवफा चायवाला' दुकानासंबंधी  मिळालेल्या माहितीनुसार, संदीप कुमार यांचे पाच वर्षापूर्वी पासून एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र 2020 मध्ये अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. इतक्या वर्षांच्या नात्यात अचानक दुरावा आला. त्यामुळे संदीप खूप नैराश्यात होता. ब्रेकअपचा निर्णय हा प्रेयसीचाच होता, असे संदीप कुमारचे म्हणणे आहे. त्यानंतर काही दिवसातच म्हणजे याच वर्षी 8 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन सप्ताहामध्ये संदीपसह त्याच्या दोन मित्रांनी मिळून हे दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला. एक दिवस आधी ही कल्पना सुचली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी रस्त्याच्या कडेला हे दुकान सुरु करण्यात आले. मग हळू हळू दुकानातील साहित्य आणण्यात आले. काउंटरही उभा राहिला. तेव्हापासून संदीप यांचे प्रेयसीच्या आठवणीतले दुकान सुरु आहे. संदीप यांनी अद्याप लग्न केलेले नाही. परंतु तो त्याच्या पायावर उभा आहे. होय, आम्ही तो ब्रेकअप विसरलो नाही, म्हणूनच 'बेवफा चायवाला' नावाची एक स्टार्ट-अप सुरू केली आहे. असे संदीपने सांगितले.

संबंधित बातम्या