आतापर्यंत इतक्या भारतीयांना देण्यात आली कोरोनाची लस

आतापर्यंत इतक्या भारतीयांना देण्यात आली कोरोनाची लस
Copy of Gomantak Banner - 2021-02-05T220547.340.jpg

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी लोकसभेत, अर्थसंकल्पात लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपये देण्यात आले असल्याचे सांगितले. व यासाठी गरज भासल्यास आणखी पैसे देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. याशिवाय कोविड लस पुरवण्यासाठी आतापर्यंत 22 देशांनी विनंती केली असल्याचे त्यांनी लोकसभेत सांगितले. त्यानंतर आतापर्यंत देशात सुमारे 50 लाख लोकांना लसी देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यानी यावेळेस नमूद केले. 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्याची प्रक्रिया मार्चच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे लोकसभेत सांगितले. त्यानंतर आजून तीन लसी क्लिनिकल चाचण्यांच्या तिसर्‍या टप्प्यात आहेत. तर दोन पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. 

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. तीन कोटी आरोग्य कर्मचारी कामगारांना लसीकरणासाठी सुमारे 480 कोटी रुपये खर्च केले जातील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील याअगोदर देशात सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे म्हटले आहे. लसीकरणाची मोहीम सुरु झाल्यानंतर 5 फेब्रुवारीपर्यंत देशात एकूण 49,59,445 लोकांना कोविड लसीकरण देण्यात आले आहे.

देशातील एकट्या उत्तर प्रदेशातच एकूण 11.9 टक्के लसीकरण झाले आहे. लोकसभेत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की आतापर्यंत 15 देशांना लसीची उपकरणे पाठविली गेली आहेत. या देशांना लसीचे 56 लाख डोस पुरविले गेले आहेत तर १० लाख डोसचा करार करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. यादरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, मिझोरम, लक्षद्वीप, ओडिशा, केरळ, हरियाणा, बिहार, अंदमान आणि निकोबार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, जिथे 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आरोग्य कर्मचार्‍यांना लसी देण्यात आली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com