मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 15 मार्चला

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

आता ज्या राज्यामध्ये आरक्षण 50 टक्क्यापेक्षा अधिक आहे, अशा राज्यांना देखील नोटीसा पाठवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या सुणावणीनंतर मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्चला होणार आहे. मराठा आरक्षणावरील सुणावणी सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाने करावी अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यासंदर्भात 8 मार्च अर्थात आजपासून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी सुरु झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही प्रतिपक्षांची बाजू ऐकल्यानंतर मराठा आरक्षणावरील सुणावणी 15 मार्चला घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आरक्षणाचा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत नसून इतर राज्यांमध्येही 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण गेलं असल्याकारणाने त्य़ा राज्यांनाही यामध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राकडून केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. आता ज्या राज्यामध्ये आरक्षण 50 टक्क्यापेक्षा अधिक आहे, अशा राज्यांना देखील नोटीसा पाठवण्यात येणार आहे.

मात्र दुसरीकडे गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्य़ाप्रकारे महाराष्ट्र सराकराने घेतलेल्या भूमिकेवर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे, ''गेल्या 12 ते 14 महिन्यांमध्ये ज्य़ा प्रकारे महाराष्ट्र सराकरने वेळ वाया घातला आहे. आणि या सगळ्या गोष्टीवर मी योग्य वेळी आढावा मांडणार आहे.आत्ता मराठा आरक्षण टिकणं हे महत्त्वाचं आहे,'' असं फडणवीस म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या याचिकेवरील सुनावणी सुरू

''या संदर्भात राज्य सराकरने घेतलेली भूमिका योग्य आहे. राज्य सराकारचं मत आहे की, हे प्रकरण मोठ्या खंडपीठासमोर गेलं पाहिजे. त्या ठिकाणी आपली भूमिका योग्य पध्दतीने मांडली पाहिजे,'' असही फडणवीस म्हणाले.

दरम्यान मराठा आरक्षणावर विरोधक फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशी टिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले य़ांनी केली. ''मराठा आरक्षणाला केवळ राजकिय वळण देऊ नये. मराठा समाजाला आरक्षणाचा फयदा मिळावा अशी आमची भूमिका आहे. मात्र भाजपकडून मराठा आरक्षणाला राजकिय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरुन मराठा समाजात चुकीचे संकेत जात आहेत,'' असही नाना पटोले म्हणाले आहेत. 

संबंधित बातम्या