मुसळधार पावसामुळे केरळमध्ये हाह:कार

राज्याच्या काही भागात परिस्थिती खूपच भीषण आहे. जीव वाचवण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व करू. मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Chief Minister Pinarayi Vijayan) यांनी केरळच्या (Kerala) राजधानीत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मुसळधार पावसामुळे केरळमध्ये (Kerala) हाह:कार
मुसळधार पावसामुळे केरळमध्ये (Kerala) हाह:कार Dainik Gomantak

शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) दक्षिण आणि मध्य केरळमध्ये (Kerala) 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यातील डोंगराळ भागात भूस्खलन (Landslide) होऊन 22 लोक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर राज्य सरकारला बचाव कार्यासाठी सशस्त्र दलांची मदत घ्यावी लागली. मुसळधार पावसानंतर 11 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), दोन लष्कर आणि दोन संरक्षण सेवा दल (DSC) यांच्यासह केंद्रीय दलाच्या टीम केरळच्या दक्षिण आणि मध्य भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे केरळमध्ये (Kerala) हाह:कार
'गुलाब' चक्रीवादळमुळे केरळ,आंध्रासह देशाच्या अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता

कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेल्या डोंगराळ भागात भूस्खलनामुळे किमान 22 लोक बेपत्ता होण्याची भीती आहे. इडुक्कीमध्ये एका कारमधून दोन व्यक्तींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. पठाणमथिट्टा आणि कोट्टायममध्ये पावसामुळे आणखी सोळा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफच्या 11 टीम केरळच्या दक्षिण आणि मध्य भागात तैनात करण्यात आल्या आहेत. मलप्पुरम, अलप्पुझा, एर्नाकुलम, त्रिशूर, पठानमथिट्टा, पलक्कड, कोट्टायम, कन्नूर आणि कोल्लम येथे प्रत्येकी एक टीम तैनात केली आहे.

केरळच्या काही भागात परिस्थिती गंभीर

“राज्याच्या काही भागात परिस्थिती खूपच भीषण आहे. जीव वाचवण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व करू. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केरळच्या राजधानीत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ते म्हणाले, आम्ही लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत मागितली आहे. जिल्ह्यांमध्ये मदत कार्य सुरू आहे. राज्य सरकार सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहे. कोट्टायम, पठानमथिट्टा आणि इडुक्की हे तीन जिल्हे मुसळधार पावसामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

पावसामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत तर बरेच लोक विस्थापित झाले आहेत. राज्यातील बहुतेक धरणे त्यांच्या पूर्ण क्षमतेने भरली गेली असून, भूस्खलनामुळे डोंगरातील अनेक लहान शहरे आणि गावे उर्वरित यांचा संपर्क तुटला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे जवान इडुक्कीच्या कोट्टायम आणि पेरुवनाथनम डोंगराळ गावांमधील कुट्टीकलमध्ये पोहोचत आहेत.

लष्कर, हवाई दल आणि नौदल मदतीसाठी पोहोचले

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "एमआय -17 आणि सारंग हेलिकॉप्टर आधीच आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. केरळमधील हवामानाची परिस्थिती पाहता हवाई दलाच्या दक्षिणी कमांडच्या सर्व तळांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पांगोड लष्करी तळावरून कोट्टायम जिल्ह्यातील कांजीरापल्ली येथे एक तुकडी पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये एक अधिकारी, दोन जेसीओ आणि 30 इतर जवानांचा समावेश आहे. "भारतीय नौदलाच्या दक्षिणी कमांडने सांगितले की ते बचावकार्यात स्थानिक प्रशासनाला पूर्ण पाठिंबा देऊन मदत कारीत आहेत. नौदलाने ट्वीट केले माहिती दिली आहे की, आमची चांगली तयारी आहे. माहिती मिळताच गोताखोर आणि बचाव दल तैनात करण्यासाठी सज्ज आहे. एकदा हवामान अनुकूल झाल्यावर हेलिकॉप्टरने देखील मदत सुरू करण्यात येईल.

मुसळधार पावसामुळे केरळमध्ये (Kerala) हाह:कार
Monsoon Update:देशात आज अनेक राज्यात मुसळधार पाऊस,तर चक्रीवादळ ओसरण्यास सुरूवात

हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने कोट्टायम, पठाणमथिट्टा, त्रिशूर, एर्नाकुलम, इडुक्की आणि पलक्कड या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जवळपासची अनेक धरणे भरल्याने अनेक धरणांचे काहींचे दरवाजे दबाव कमी करण्यासाठी उघडण्यात आले आहेत. हवामान विभागाने सांगितले की, कोट्टायमच्या काही भागात गेल्या 24 तासांत 30 सेमी पाऊस पडला आहे तर काही भागात जोरदार वारे वाहत आहेत.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी सायंकाळी पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेत प्रभावित भागात बचाव कार्य तीव्र करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावित क्षेत्रातील लोकांना वाचवण्यासाठी आणि पूर किंवा भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या अनेक भागातून लोकांना हलविण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले होते. विजयन यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बाधित आणि विस्थापित लोकांसाठी मदत छावण्या उघडण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की ही शिबिरे कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे संचालन केले पाहिजेत.

उच्च शैक्षणिक संस्था 20 ऑक्टोबरपासून सुरू

हवामान खात्याने 19 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिल्याने, बैठकीत असेही ठरविण्यात आले की, 18 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही यात्रेकरूंना पठाणमथिट्टाच्या घनदाट जंगलात असलेल्या सबरीमाला अयप्पा मंदिरात जाण्याची परवानगी देऊ नये. 18 ऑक्टोबरपासून उघडण्यात येणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्था आता 20 ऑक्टोबरपासून सुरू होतील, असे निवेदनात म्हटले आहे. विजयन यांनी राज्यातील लोकांना पुढील 24 तासांमध्ये अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com