Bihar Accident: बिहारमध्ये लहान मुलांसह दहा जणांना ट्रकने चिरडले, जेवण करून घरी जात असताना झाला अपघात

अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. अशी भिती व्यक्त केली जात आहे.
Bihar Accident
Bihar AccidentDainik Gomantak

Bihar Accident: बिहारमधील हाजीपूरमध्ये भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दहा लोकांना चिरडले आहे. रात्रीचे जेवण करून लोक घरी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Bihar Accident
Winter Skincare Tips: हिवाळ्यात तजेलदार त्वचेसाठी सोप्पे घरगुती उपाय, हमखास होणार फायदा

मिळालेल्या माहितीनुसार, दगावलेल्या लोकांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. जेवण करण्यासाठी नातेवाईकांसह लहान मुले देखील गेली होती. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी हाजीपूर रुग्णालयातून एक शव आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.

Bihar Accident
Pune Major Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ मोठा अपघात; 48 वाहनांचे नुकसान, 30-35 जण जखमी

दरम्यान, या अपघातात ट्रकचा चालक देखील स्टेअरिंगमध्ये अडकून गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रक झाडावर जाऊन आदळला. घटनास्थळापासून जवळच असलेल्या गावात एक पूजा होती. त्याच ठिकाणी हे लोक मुलांसह जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे जेवण करून ते परतत असताना हा अपघात झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com