बालसंगोपन केंद्रामधील बालकांना तीस दिवसांच्या आत निधी द्या

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

 बालसंगोपन केंद्रात राहणाऱ्या पण कोरोनामुळे ज्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशा मुलांच्या खर्चासाठी दरमहा दोन हजार रुपये द्या,

नवी दिल्ली: बालसंगोपन केंद्रात राहणाऱ्या पण कोरोनामुळे ज्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशा मुलांच्या खर्चासाठी दरमहा दोन हजार रुपये द्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विविध राज्यांना दिले आहेत. राज्यांनी या मुलांना आवश्‍यक सोयी सुविधा द्याव्यात तसेच त्यांना पुस्तके, स्वच्छतेसाठीची सामग्री आणि ऑनलाइन क्लासेससाठी आवश्‍यक असणारी साधने देखील द्यावीत, असे निर्देशही न्यायालयाने दिले. 

जिल्हा बाल संरक्षण केंद्रांनी केलेल्या शिफारशींच्या आधारावर तीस दिवसांच्या आत त्यांना ही मदत देण्यात यावी असे या आदेशांत नमूद केले. न्या. एल. नागेश्‍वरराव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

संबंधित बातम्या