हेमा मालिनींनी दिला कोरोना महामारी संपेपर्यंत रोज होम हवन करण्याचा सल्ला

दैनिक गोमंतक
रविवार, 6 जून 2021

या व्हिडीओ नंतर हेमा मालिनी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका  होते आहे. 

भाजप (BJP) खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या त्या  चर्चेत असल्याचे पाहायला मिळते आहे. देशात सुरु असलेल्या कोरोना (Covid-19) महामारीच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव (Baba Ram Deo) यांनी ऍलोपॅथी बद्दल केलेल्या विधानाचा  वाद थांबतो न थांबतो त्यात आता हेमा मालिनी यांनी कोरोना महामारी संपेपर्यंत प्रत्येकाने घरात होम हवन करावा असा सल्ला दिला आहे. (Hema Malini advised daily Havan until the end of the Corona epidemic)

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हेमा मालिनी यांनी केलेला एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत हेमा मालिनी हवन  करत असल्याचे पाहायला मिळते आहे.  या व्हिडीओ हेमा मालिनी 'कोरोना आल्यापासून आपण रोज घरात हवन करत असून, रोज अशा प्रकारचा हवन केल्याने वातावरण देखील शुद्ध होते' असे सांगिलते आहे. या व्हिडीओ नंतर हेमा मालिनी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका  होते आहे. 

''सरकार फक्त श्रेय घेत राहिलं''... अमर्त्य सेन यांचा मोदी...

या व्हिडिओमध्ये हेमा मालिनी पुढे असेही म्हणतात की, प्राचीन काळापासूनच भारतात नाकारत शक्तींना नष्ट करून वातावरण शुद्ध करण्यासाठी लाभदायक मानले गेले असून, आज संपूर्ण विश्व महामारी आणि पर्यावरणाच्या संकटाला सामोरे जाते आहे. अशात फक्त पर्यावरण दिनी नाही तर महामारीचा अंत होई पर्यंत प्रत्येक दिवशी होम हवन करत राहा. 

संबंधित बातम्या