खासदार केसी वेणुगोपाल यांना धक्काबुक्की, काँग्रेसचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

दिल्लीत काँग्रेसच्या निषेध मोर्चादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांना धक्काबुक्की करण्यात आली.
खासदार केसी वेणुगोपाल यांना धक्काबुक्की, काँग्रेसचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
K. C. VenugopalDainik Gomantak

दिल्लीत काँग्रेसच्या निषेध मोर्चादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांना धक्काबुक्की करण्यात आली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात ही घटना घडली. (herald money laundering case kc venugopal manhandled as delhi police detain congress leaders)

दरम्यान, काँग्रेसची ही निषेध यात्रा सकाळी 10 वाजता सुरु होणार होती, मात्र दिल्ली पोलिसांनी सकाळपासूनच काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या या आंदोलनाला दिल्ली (Delhi) पोलिसांनी परवानगी दिली नाही. काँग्रेस (Congress) कायकर्त्यांनी राहुल गांधींच्या पाठीशी असल्याचे दाखवत पक्ष कार्यालय ते अंमलबजावणी संचालनालयापर्यंत या निषेध मोर्चाचे नियोजन केले होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी ईडीसमोर हजर झाले.

तसेच, रविवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता मोर्चाला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसने आवाहन करुनही दिल्ली पोलिसांनी मान्यता दिली नाही. दिल्ली पोलिसांची कारवाई सकाळीच सुरु झाली. जबरदस्तीने हटवण्याच्या कवायतीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांना बसमध्ये बसवून इतर ठिकाणी नेण्यात आले. यापैकी एक व्हिडिओ नंतर समोर आला, ज्यामध्ये 59 वर्षीय वेणुगोपाल यांना पोलिसांनी जबरदस्तीने नेले आणि बसमध्ये बसवले.

K. C. Venugopal
राज्यपालांच्या अधिकारात घट, ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय

शिवाय, युवक काँग्रेसचे प्रमुख बीव्ही श्रीनिवास यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करुन लिहिले, 'राज्यसभेचे विद्यमान खासदार आणि काँग्रेसचे सरचिटणीस @kcvenugopalmp यांच्यासोबत दिल्ली पोलिसांची ही वागणूक अत्यंत निषेधार्ह आहे. यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी तुघलक रोड पोलीस स्टेशन गाठून वेणुगोपाल यांची भेट घेतली. काँग्रेस कार्यकर्त्यांसह वेणुगोपाल यांना कोठडीत ठेवण्यात आले होते. केंद्र सरकार विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com