'वंदे भारत मिशन' अंतर्गत आज होणारी उड्डाणे

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

कोरोनाव्हायरसमुळे अडकलेल्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 6 मे रोजी 'वंदे भारत मिशन' सुरू केले. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एअर इंडिया ग्रुपतर्फे वंदे भारत मिशन अंतर्गत 30 डिसेंबरपर्यंत 12,672 उड्डाणे करण्यात आली.

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसमुळे अडकलेल्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 6 मे रोजी 'वंदे भारत मिशन' सुरू केले. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एअर इंडिया ग्रुपतर्फे वंदे भारत मिशन अंतर्गत 30 डिसेंबरपर्यंत 12,672 उड्डाणे करण्यात आली असून यात 16.84 लाखाहून अधिक प्रवासी होते. यापैकी, 6,333 उड्ड्णांद्वारे 10.28 प्रवाशांना भारतात परत आणण्यात आलं, तर 6.55 लाख प्रवाशांना बाहेरील देशांमध्ये पोहोचवण्यात आलं. हे अभियान सध्या सातव्या फेज मध्ये आहे जे 28 मार्च 2021 पर्यंत सुरू राहिल.

वंदे भारत अंतर्गत एअर इंडियाचे आजचे वेळापत्रक : 

( भारतातून बाहेरील देशात जाण्यासाठी  - स्थानिक वेळेनुसार)

> एआय 1336 बेंगलुरू (01:30) ते सिंगापूर (08:20)

> एआय 1917 मुंबई (18:40) ते दम्मम (20:40)

> एआय 0951 हैदराबाद (22:30) ते दुबई (00:30)

> एआय 0983  मुंबई (08:30) ते दुबई (10:30)

> एआय 1931 दिल्ली (17:45) ते दुबई (20:00)

> एआय 1965 दिल्ली (२१:00) ते अबुधाबी (23:45)

 

(बाहेरील देशांमधून भारतात येण्यासाठी - स्थानिक वेळेनुसार)

> एआय 0301 सिडनी (10: 15) ते दिल्ली (18:05)

> एआय 1918 दम्मम (21:40) ते मुंबई (03:25)

> एआय 1984 दुबई (11:30) ते अहमदाबाद (16:00)
> एआय 1932 दुबई (21:00) ते अमृतसर (01:50)

> एआय 1962 अबू धाबी (06:35) ते हैदराबाद (07:40)
 

संबंधित बातम्या