Hijab Controversy: कॉलेज प्रशासनाची मोठी कारवाई, तीन विद्यार्थ्यांनी केला कॉलेजला रामराम

कर्नाटकातील मंगळुरू येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Hijab Controversy: कॉलेज प्रशासनाची मोठी कारवाई, तीन विद्यार्थ्यांनी केला कॉलेजला रामराम
HijabDainik Gomantak

कर्नाटकातील मंगळुरू येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये (University College) हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हिजाबवरील बंदीला विरोध करणाऱ्या दोन मुस्लिम विद्यार्थिनींनी इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देखील मिळवले आहे, तर एकाला ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) देण्यात आले आहे. (Hijab Controversy College administration's big action three students say goodbye to the college)

Hijab
Breast Cancer: रक्ताच्या चाचणीतून ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणारी चाचणी भारतात उपलब्ध

कॉलेजच्या प्राचार्या अनसूया राय यांनी सांगितले की पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या आणखी एका मुलीने कॉलेजच्या अधिकाऱ्यांना माफीनामा पत्र देखईल लिहिले आहे आणि ती ऑनलाइन क्लासेसमध्ये सहभागी होत आहे. राय म्हणाले की, केरळमधील एका एमएससी (केमिस्ट्री) मुस्लिम विद्यार्थ्यानेही प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत हस्तांतरण प्रमाणपत्र कॉलेजकडून घेतले आहे.

मंगळुरू विद्यापीठाचे कुलगुरू पीएस यदापादिथया यांनी जाहीर केले होते की जर मुस्लिम विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गणवेशाच्या नियमांचे पालन करण्यास तयार नसतील आणि इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी कोणतीही अडचण नाहीये, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कॉलेजमधील हिजाबच्या वादाबाबत हे प्रकरण मार्चमध्ये उच्च न्यायालयामध्ये पोहोचले होते. वर्गात हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या, तर याआधी फेब्रुवारीमध्ये कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समानता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे कपडे घालण्यावर बंदी घातली होती, ज्याला उच्च न्यायालयामध्ये (High Court) आव्हान देण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com