हिमाचल पर्यटन: नोंदणी सुरू; नव्या मार्गदर्शक सूचना ठरणार अडचणीच्या

हिमाचलला पर्यटकांचे ‘अस्ते कदम’
हिमाचलला पर्यटकांचे ‘अस्ते कदम’

सिमला: निसर्गरम्य हिमाचल प्रदेश पाहण्यासाठी पर्यटक तयार असले तरी कोरोनामुळे लागू करण्यात आलेले नियम पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी अडचणीचे ठरू लागले आहेत. हिमाचल प्रदेश सरकारने अनलॉक सुरू झाल्याने पर्यटकांची नोंदणी सुरू केली आहे. मात्र, तीन दिवसांपूर्वी जारी केलेल्या नव्या नियमानुसार पर्यटकांना हिमाचलमध्ये येण्यापूर्वी ९६ तास कोविड चाचणी करावी लागणार आहे. अहवाल नकारात्मक असेल तरच हिमालचमध्ये प्रवेश मिळणार आहे. 

कोरोना संसर्गाच्या प्रकोपामुळे देशभरातील पर्यटन स्थळ बंद असल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प पडला आहे. काश्‍मीर, हिमाचल, उत्तराखंड, दक्षिण भारत आदी ठिकाणचे पर्यटनस्थळ पर्यटकांअभावी सुनेसुने पडले आहेत. परंतु आता हिमाचल सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी काही अटींवर परराज्यातील नागरिकांना प्रवेश देण्याची तयारी केली आहे. यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने दोन दिवसांपासून पर्यटकांसाठी नोंदणी सुरू केली आहे. नव्या नियमांनुसार राज्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविड चाचणी बंधनकारक आहे. परंतु त्यासाठी अडीच हजार रुपयांपर्यतचा खर्च उचलावा लागणार आहे. त्यामुळे कुटुंबासह हिमाचल दौरा करण्याचे नियोजन आखणाऱ्या मंडळींना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे पर्यटकांकडून केवळ चौकशी केली जात आहे, परंतु नियमांमुळे ते येण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत, असे स्थानिक हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.  

काहींना चाचणीपासून सवलत
दहा वर्षापर्यंतच्या मुलांना कोविड चाचणीपासून सवलत देण्यात आली आहे. आता पर्यटक ९६ तासांपूर्वीच्या आरटी-पीसीआर तसेच टू नॉट आणि सीबी नॉट टेस्टची निगेटिव्ह चाचणी अहवाल घेऊन फिरण्यासाठी राज्यात येऊ शकतात. 

गाडी चालकास क्वारंटाइनची गरज नाही
आता टॅक्सी आणि खासगी गाडीच्या चालकांना क्वारंटाइन राहण्याची गरज नाही. पूर्वी ७२ तासापूर्वीचा अहवाल गृहित धरला जात होता. आता ९६ तासापूर्वी केलेल्या चाचणीचा निगेटिव्ह अहवाल देखील पर्यटकांना फिरण्यासाठी परवानगी देणारा आहे. 

सीमेवर रॅपिड चाचणी करा
कोविड चाचणी बंधनकारक करण्याऐवजी अन्य राज्यांप्रमाणे हिमाचलच्या सीमेवर रॅपिड चाचणी करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पर्यटकांचा वेळ आणि पैसा वाचू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जम्मू काश्‍मीर आणि दिल्लीच्या सीमेवर ३०० रुपयांपासून ४०० रुपये किंवा मोफत चाचणी केली जात आहे. त्याचा अहवाल दहा मिनिटात मिळतो. तसेच महाराष्ट्र, कोलकता आणि अन्य राज्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वे सेवा बहाल करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून येणाऱ्या पर्यटकांना हिमाचलमध्ये चांगली सेवा मिळू शकते.

दोन रात्रीचेच पॅकेज
पर्यटकांना हिमाचलमध्ये येण्यासाठी पर्यटन श्रेणीत नोंदणी करावी लागणार आहे. चोवीस तासात संबंधित जिल्हा अधिकाऱ्याने अर्ज मंजूर केला नाही तर सॉफ्टवेअर आपोआप अर्जाला परवानगी देईल. किमान दोन रात्रीच्या पॅकेजवर प्रवासी विविध भागात फिरु शकतील. पूर्वी हिमाचलमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान पाच दिवस हॉटेल बुकिंग करणे गरजेचे होते. परंतु आता दिवस कमी केले असून केवळ दोनच दिवस राज्यात राहता येणार आहे.

नवीन ९३ रुग्ण
हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या चोवीस तासात नव्याने ९३ रुग्ण आढळून आले असून राज्यातील बाधितांची संख्या ५७३१ वर पोचली आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला असून एकुण मृतांची संख्या ३३ वर पोचली आहे. सध्या राज्यात १५०० रुग्णावर उपचार सुरू आहेत. कांग्रा जिल्ह्यातील ५६ वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. याशिवाय त्यांना कर्करोग होता व पंजाबमध्ये उपचार सुरू होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com