नष्ट व्हायच्या मार्गावर असलेल्या हिमबिबट्यांच्या संख्येत वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

हिमाचल प्रदेशातील हिमालयीन पर्वतरांगात सुमारे 73 हिमबिबटे असल्याचे गणनेतून निदर्शनास आले आहे.

सिमला :  हिमाचल प्रदेशातील हिमालयीन पर्वतरांगात सुमारे 73 हिमबिबटे असल्याचे गणनेतून निदर्शनास आले आहे. राज्य वनविभागाचा वन्यप्राणी विभाग आणि म्हैसूरची नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन यांच्या सहकार्याने हिमाचल प्रदेशातील हिमबिबट्यांची गणना करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने निश्‍चित केलेल्या शास्त्रीय आधारावर हिमबिबट्यांचे मूल्यांकन (स्नो लिओपॉर्ड पॉप्युलेशन असेसमेंट) करणारे हिमाचल प्रदेश पहिले राज्य ठरले आहे.  

काश्‍मिरी पंडिताला दिला मुस्लिमांनी खांदा 

राज्याचे वनमंत्री राकेश पठाणिया यांनी गणनेच्या कामाबद्दल वन्यप्राणी विभागाचे कौतुक केले आहे. अशा प्रकारचे पहिलेच मूल्यमापन असल्याचेही ते म्हणाले. हिमबिबट्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारचे सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे, असे पठाणिया म्हणाले. गणनेसाठी डोंगराळ प्रदेशात कॅमेरा लावण्याचे काम किब्बर खेड्यातील आठ तरुणांच्या पथकाने केल्याचे ते म्हणाले.

भारत-पाकिस्तान कथुआ सीमेवर पुन्हा भुयार सापडले

राज्यात सरासरी दर 

हजार चौरस किलोमीटर परिसरात तीन हिमबिबटे आढळतात, सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यातही स्पिटी, पीन खोरे आणि किन्नोरचा वरच्या भागात हिमबिबट्यांची संख्या अधिक आहे. या सर्वेक्षणातून हिमबिबट्या कोणत्या जनावरांची शिकार करताते, हे देखील निदर्शनास आले आहे. त्यांची संख्या देखील अधिक असण्याची शक्यता आहे. त्यात आयबेक्स, भरल(ब्लूशिप)चा समावेश आहे. 

संबंधित बातम्या