LIC: अदानी ग्रुपनंतर एलआयसीच्या दरातही घट, 'हे' आहे कारण

LIC: हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर, एलआयसीला सुद्धा नुकसानाचा सामना करावा लागत आहे. एलआयसी केवळ भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी नाही तर भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणूकदार संस्था आहे.
LIC
LICDainik Gomantak

LIC: हिंडेनबर्गने प्रस्तुत केलेल्या रिपोर्टनंतर,अदानी ग्रुपला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेअर मार्केटमध्येदेखील पडझड दिसून येत आहे. अदानी ग्रुपमध्ये देशाची सर्वात मोठी वीमा कंपनी एलआयसी ( LIC )ची देखील गुंतवणुक आहे.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर, एलआयसीला सुद्धा नुकसानाचा सामना करावा लागत आहे. एलआयसी केवळ भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी नाही तर भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणूकदार संस्था आहे.

अदानी ग्रुपबाबतचा हिंडेनबर्गचा रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर मार्केट मधील दर खाली गेले असल्याने एलआयसीच्या व्यवहारातदेखील त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

LIC
Manipur Earthquake: मणिपूरमध्ये जाणावले भूकंपाचे धक्के , रिश्टर स्केलवर 4.0 तीव्रता

एलआयसीची गुंतवणूक असलेला अदानी समूह( Adani Group) हा एकटाच नाही तर इतर अनेक कंपन्यामध्ये एलआयसीची गुंतवणूक आहे. गेल्या 6 महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये या कंपनाचे 20 टक्के दर घसरल्याचे दिसून आले आहेत.

बाहेरच्या घटकांचा शेअर मार्केटच्या दरांवर परिणाम होत असतो. तज्ञांच्या मते , मागच्या सहा दिवसातील एलआयसी( LIC )च्या नफ्या-तोट्याचा विचार करु नये कारण एलआयसीने गेल्या अनेक वर्षापासून छोट्या मोठ्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.

दरम्यान, एस इक्विटीच्या आकडेवारीनुसार,अदानी ग्रुपच्याबरोबर इतर कंपन्यामध्ये मागच्या सहा महिन्यात एलआयसीची शेअर व्हॅल्यूमध्ये 58 टक्क्यांनी घट झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com