"जर पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलू शकतात ...": अमित शाह

देशात असंख्य भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेची वेगळी समृद्धता आणि साहित्यिक परंपरा असून ज्यामधून सरकारच्या स्वावलंबी भारताच्या मोठ्या योजनेचा भाग व्यापला आहे.
"जर पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलू शकतात ...": अमित शाह
Home Minister Amit ShahDainik Gomantak

देशभरात दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. याच पाश्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी मंगळवारी हिंदी दिवसावर (Hindi Diwas) एका कार्यक्रमादरम्यान विचार मांडले आहेत. देशात हिंदी भाषा व्यापक स्तरावर बोलली जावी असही त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर आपल्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकतेचा पाया मूलभूत हिंदीने घातला आहे. शाह पुढे म्हणाले की, देशात असंख्य भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेची वेगळी समृद्धता आणि साहित्यिक परंपरा असून ज्यामधून सरकारच्या स्वावलंबी भारताच्या मोठ्या योजनेचा भाग व्यापला आहे.

दरम्यान, शाह म्हणाले की, स्वावलंबी भारत म्हणजे भाषेच्या बाबतीतही स्वावलंबी असणे होय. आपली मातृभाषा आणि राजभाषा यांच्यातील समन्वय यात आहे. हिंदी दिवसावर, मी लोकांना आवाहन करतो की, हिंदीचा जास्तीत जास्त प्रचार केला जावा. जी आपली अधिकृत राजकीय भाषाही आहे.

Home Minister Amit Shah
'जो नफ़रत करे,वह योगी कैसा!' राहुल गांधींचा योगींवर घणाघात

तसेच, गृहमंत्री पुढे म्हणाले, भाषा मनोभाव व्यक्त करण्याचे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. हिंदीने आपल्या सांस्कृतिक चेतनेचा आणि राष्ट्रीय एकतेचा मूलभूत पाया मजबूत केला आहे. त्याचबरोबर प्राचीन सभ्यता आणि आधुनिक प्रगतीमधील हिंदी एक पूल आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हिंदी आणि सर्व भारतीय भाषांच्या समांतर विकासासाठी सातत्याने वचनबद्ध आहोत.

शिवाय, शहा म्हणाले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pantpradhan Narendra Modi) आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलू शकतात, तर आम्हाला कशाबद्दल लाज वाटते. ते दिवस गेले जेव्हा हिंदी बोलणे हा चिंतेचा विषय होता. गृहमंत्री म्हणाले की, सरकार हिंदी आणि देशातील इतर भाषांच्या समांतर विकासासाठी कटिबद्ध आहे.

Home Minister Amit Shah
"काहीही झालं तरी सीएए लागू होऊ देणार नाही"; राहुल गांधींचा घणाघात

शहा व्यतिरिक्त, पीएम मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही हिंदीच्या अधिक प्रचार प्रसारासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. 14 सप्टेंबर रोजी देशभरात हिंदी दिवस साजरा केला जातो. मात्र, हिंदी भाषा लादण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत अनेक राज्ये या मुद्द्यावर विरोध करत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com