वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण! 2 हिंदु बहिणींनी ईदगाहला दान केली कोट्यावधींची जमीन

देशाच्या विविध भागांतून जातीय तणावाच्या बातम्या येत असताना, काशीपूर शहरात दोन बहिणींनी दिला एकतेचा संदेश
Hindu Sisters Donate Land
Hindu Sisters Donate LandDainik Gomantak

देशात मुस्लिम बाधवांचा महत्वाची पवित्र रमजान ईद हा सण फार पडला. मुस्लिम बांधव या महिन्यात सढळ हाताने दान करतात. असच एक दान हिंदू भगिनींनी केले आहे. आपल्या दिवंगत वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी, दोन हिंदू बहिणींनी (Hindu sisters) ईदच्या सणापूर्वी ईदगाहच्या विस्तारासाठी दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची त्यांची साडे तीन एकर जमीन दान केली. या भगिनींचे केलेले हे दान मुस्लिमांच्या हृदयात घर करणारे आहे. या बहिणींनी दिवंगत वडिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थनाही केली. (Hindu Sisters Donate Land)

Hindu Sisters Donate Land
UN World Food प्रोग्राम शिष्टमंडळाने अमृतसरला दिली भेट

काशीपूरमध्ये चर्चेचा विषय

देशाच्या विविध भागांतून जातीय तणावाच्या बातम्या येत असताना, उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर (Kashipur) या छोट्याशा शहरात दोन बहिणींचा हे औदार्य चर्चेचा विषय ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीस वर्षांपूर्वी मृत्यूपूर्वी ब्रजानंदन प्रसाद रस्तोगी यांनी जवळच्या इदगाहच्या विस्तारासाठी त्यांची साडेतीन एकर शेतजमीन दान करायची असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितले होते.

दरम्यान रस्तोगी यांचे जानेवारी 2003 मध्ये त्यांच्या मुलांना शेवटची इच्छा सांगण्याआधीच त्यांचे निधन झाले. दिल्ली आणि मेरठमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहणाऱ्या सरोज आणि अनिता या त्यांच्या मुलींना त्यांच्या वडिलांची ही इच्छा नुकतीच कळली, म्हणून त्यांनी ताबडतोब काशीपूरमध्ये राहणारा त्यांचा भाऊ राकेश यांच्याशी संमती मिळवण्यासाठी संपर्क साधला. राकेशनेही लगेच होकार दिला आणि पवित्र रमजानच्या महिन्यात हे दान केले.

Hindu Sisters Donate Land
पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

दोघी बहिणींनी दिली समानतेचा संदेश

राकेश रस्तोगी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वडिलांच्या शेवटच्या इच्छेचा आदर करणे हे आमचे कर्तव्य आहे. माझ्या बहिणींनी वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल असे काहीतरी केले आहे. इदगाह कमिटीचे हसीन खान म्हणाले, "दोन्ही बहिणींनी केलेले हे कार्य जातीय एकतेचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या या औदार्याबद्दल ईद गाह समिती कृतज्ञता व्यक्त करते. दोन्ही बहिणींचे लवकरच समीतीच्या वतिने अभिनंदन केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com