10 वर्षाच्या भारतीय मुलीनं रचला इतिहास! जाणून घ्या

दैनिक गोमंतक
शनिवार, 8 मे 2021

तिचा हा कार्यक्रम हा युट्यूब, फेसबुक, लिंक्डइनवर लाईव्ह प्रसारीत करण्यात आला होता.

सध्या दुबईमध्ये (Dubai) वास्तव्यास असणारी आणि मूळची राजस्थानची (Rajasthan) असणारी सारा छीपा (Sara chipa) या मुलीनं एक अनोखा इतिहास रचला आहे. जगभरातील 196 देश, त्यांच्या राजधान्या आणि त्या त्या देशांमध्ये वापरलं जाणारं चलन या सर्व गोष्टी सारा छीपाच्या अगदी तोंडपाठ आहेत. 2 मे रोजी दुबईमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन पध्दतीने झालेल्या कार्यक्रमात सारा छीपानं हा विश्वविक्रम केला आहे. तिचा हा कार्यक्रम हा युट्यूब, फेसबुक, लिंक्डइनवर लाईव्ह प्रसारीत करण्यात आला होता. या श्रेणीमध्ये विक्रम करणारी सारा जगात पहिलीच व्यक्ती ठरली आहे. साराच्या या कामगिरीनंतर राजस्थानमधील भिलवाडा या तिच्या मूळगावी जोरदार जल्लोष करण्यात आला. (History made by a 10 year old Indian girl Find out)

लोकांचा जीव जातोय...’; राहुल गांधीचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

आतापर्यंत जगातील सगळे देश आणि त्यांच्या राजधानींची नावं तोंडपाठ ठेवण्याचा विश्वविक्रम करण्यात आला होता. मात्र, साराने त्यापुढे अजून एक पाऊल टाकत या दोन गोष्टींसोबतच या सर्व देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चलनांच्या माहितीचाही आपल्या विक्रमात नोंद केली. देशांचा नावं, त्यांच्या राजधानींची नावं आणि त्यांच्या चलनांची नावं एकूण 585 नावं तोंडपाठ करण्यासाठी सुरुवातीला साराला तब्बल दीड ते दोन तास लागत असे. परंतु तीन महिने सराव केल्यानंतर साराने हा वेळ दीड ते दोन तासानंतर थेट 15 मिनिटावर आणला. जगभरातील देशांची नावं, चलनं आणि त्यांच्या राजधान्या लक्षात ठेवण्याचं महाकठीण काम सारानं सरावातून साध्य करु दाखवलं. त्यामुळे सगळीकडे सारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
 

संबंधित बातम्या