राजस्थानातील हिंसाचाराचा काळा इतिहास: 8 वर्षांत 3300 हून अधिक हिंसाचाराच्या घटना

राजस्थानच्या (Rajasthan) भिलवाडामध्ये सध्या जातीय तणावाची परिस्थिती आहे.
राजस्थानातील हिंसाचाराचा काळा इतिहास: 8 वर्षांत 3300 हून अधिक हिंसाचाराच्या घटना
BhilwaraDainik Gomantak

राजस्थानच्या भिलवाडामध्ये सध्या जातीय तणावाची परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने 24 तास इंटरनेट सेवा बंद केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा आदर्श नावाच्या 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. हत्येनंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पाहता गुरुवार, 12 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शहरातील पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसटीएफ आणि आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. (History of Violence in Rajasthan More than 3300 incidents of violence in eight years)

दरम्यान, राजस्थानमध्ये (Rajasthan) भिलवाडामध्ये सध्या जातीय तणावाची परिस्थिती आहे. गेल्या दोन महिन्यांतील जातीय तणावाची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 2 एप्रिलला हिंदू नववर्षानिमित्त करौलीमध्ये हिंसाचार उसळला होता. जोधपूरमध्ये 2 मे रोजी हिंसाचार झाला होता. त्यानंतर धार्मिक ध्वज हटवण्यावरुन वाद सुरु झाला आणि नंतर दगडफेक सुरु झाली. राजस्थानमध्ये गेल्या आठ वर्षांत किती दंगली झाल्या आणि गेल्या वर्षभरात काय घडले ते जाणून घेऊया...

Bhilwara
'ओपनिंग सुरु', गुजरात काँग्रेसला निवडणूक रणनीतीकाराची गरज

गेल्या आठ वर्षांत 3300 हून अधिक दंगली

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, गेल्या आठ वर्षांत (2013-2020) राज्यात 3,342 दंगली झाल्या. या दरम्यान 2013 मध्ये सर्वाधिक 542 दंगली झाल्या. 2014 मध्ये 536 तर 2015 मध्ये 424 दंगली झाल्या. गेल्या आठ वर्षात 2016 मध्ये सर्वात कमी 269 दंगली झाल्या. 2021 च्या जातीय दंगलींची आकडेवारी उपलब्ध नाही. या आठ वर्षांत 3547 लोक दंगलीचे बळी ठरले आहेत.

तीन वर्षांत जातीय हिंसाचाराच्या पाच मोठ्या घटना

1. टोंकमध्ये मिरवणुकीवर दगडफेकीनंतर हिंसाचार भडकला: हे प्रकरण 08 ऑक्टोबर 2019 चे आहे. टोंक जिल्ह्यात दसरा मिरवणूक काढण्यात आली. मालपुरा शहरात मिरवणुकीत सहभागी लोकांवर काही हल्लेखोरांनी दगडफेक सुरु केली. यानंतर हिंसाचार उसळला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद करुन संचारबंदी लागू केली. तसेच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी टोंक आणि जयपूर येथून अतिरिक्त पोलिस (Police) दल मागवून शहरात तैनात करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबर रोजी प्रचंड पोलिस बंदोबस्तात रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

2. बरानमध्ये दोन तरुणांच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला: ही घटना 11 एप्रिल 2021 ची आहे. बरान जिल्ह्यात दोन तरुणांची हत्या करण्यात आली. याचा ठपका इतर समाजाच्या लोकांवर टाकण्यात आला. यानंतर हिंसाचार उसळला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी इंटरनेट बंद करुन संचारबंदी लागू केली. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.

Bhilwara
आम्हाला घाबरण्याची गरज नाही, पुढील निवडणूक आम्हीच जिंकणार

3. तरुणांच्या वादातून झालावार : हे प्रकरण 19 जुलै 2021 चे आहे. झालावाडमध्ये दोन समाजातील तरुणांमध्ये वाद झाला. काही वेळाने इथे हिंसाचार उसळला. दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले. घरे, दुकाने आणि दुचाकींची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. बळाचा वापर करुन पोलिसांनी लोकांना नियंत्रित केले. अफवा रोखण्यासाठी प्रशासनाने काही भागात तीन दिवस इंटरनेट सेवा बंद केली. यादरम्यान पोलिसांनी 200 हून अधिक लोकांविरुद्ध हिंसा भडकावल्याप्रकरणी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

4. करौलीत बाईक रॅलीवर दगडफेक, हिंसाचार भडकला, दुकाने आणि घरे जाळली: यावर्षी 2 एप्रिलला करौलीमध्ये हिंदू नववर्षानिमित्त तरुणांनी बाईक रॅली काढली. रॅलीवर दगडफेकीनंतर हिंसाचार झाला. हल्लेखोरांनी 35 हून अधिक दुकाने, घरे आणि दुचाकी पेटवून दिल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आणि त्यानंतर इंटरनेट सेवा बंद केली. या हिंसाचारात पोलिसांसह 43 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शहरातील लोक जवळपास 15 दिवस घरात कैद झाले होते.

Bhilwara
विधानसभा निवडणुकीआधी गुजरात सरकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे 'गिफ्ट'

5. जोधपूरमध्ये धार्मिक ध्वज घेऊन दोन समुदाय समोरासमोर आले: 2 मे 2022 रोजी जोधपूरमध्ये परशुराम जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. यावेळी जालोरी गेट चौकात झेंडे लावण्यात आले. रात्री उशिरा ईदनिमित्त समाजातील लोकांनी या चौकात झेंडे लावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले आणि दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी लाठीहल्ला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीत डीसीपी भुवन भूषण यादव, एसएचओ अमित सिहाग यांच्यासह चार पोलिस आणि काही मीडिया कर्मचारीही जखमी झाले. तीन दिवस संपूर्ण शहरात संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.