हिज्बुलचा कमांडर सैफुल्ला ठार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर डॉ. सैफुल्ला पोलिसांबरोबरील चकमकीत आज मारला गेला, तर आणखी एक दहशतवाद्याला पकडण्यात आले. 

श्रीनगर :  हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर डॉ. सैफुल्ला पोलिसांबरोबरील चकमकीत आज मारला गेला, तर आणखी एक दहशतवाद्याला पकडण्यात आले. सुरक्षा दलांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.यावर्षी मे महिन्यामध्ये रियाझ नायकू हा चकमकीत मारला गेल्यानंतर सैफुल्ला याने हिज्बुल मुजाहिदीनची सूत्रे हाती घेतली होती.

सुरक्षा दलांवरीलअनेक हल्ल्यांमागे त्याचा हात होता. सैफुल्ला मारला गेल्याने मोठे यश मिळाले आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली. रंग्रेथ भागामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सकाळी सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शोध मोहीम सुरू केली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू  केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सैफुल्ला ठार झाला, तर त्याचा साथीदार पकडला गेला. घटनास्थळावरून शस्त्रे,  दारूगोळा आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संबंधित बातम्या