Holi 2021 Guidelines: तुमच्या राज्यातील होळीसाठी कोरोना मार्गदर्शक सूचना जाणून घ्या

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

अलिकडच्या काळात कोविड -19 विषाणूच्या नवीन प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढली आहे. हे लक्षात घेता दिल्ली, बिहार, ओडिशासह असा अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यास बंदी घातली आहे.

नवी दिल्ली: अलिकडच्या काळात कोविड -19 विषाणूच्या नवीन प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढली आहे. हे लक्षात घेता दिल्ली, बिहार, ओडिशासह असा अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यास बंदी घातली आहे. कोविड -१९ मुळे पुन्हा एकदा लोकांना घरांत बसून होळी साजरी करावी लागणार आहे. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास बंदी घातली आहे. दिल्लीत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. मुंबई आणि चंदीगडमध्येही असेच नियम लावण्यात आले आहेत. बिहार, मध्य प्रदेशात लोक घरात होळी साजरी करण्याचे आवाहन करत आहेत. देशभरात होळीबाबत राज्यांनी काय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, हे आपण बघूया.

दिल्ली

राजधानी दिल्लीत होळी, नवरात्र, शब-ए-बारात यासह इतर सणांवर सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाही. म्हणजेच, एकत्रित येण्याची आणि होळी खेळण्याची परवानगी नाही.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, बाजार किंवा धार्मिक ठिकाणी सार्वजनिक उत्सव आयोजित करण्यास बंदी असेल.
गाड्या, बस आणि विमानांमध्येही कडक निर्बंध लावले जाईल. मास्क, सेनिटायझर आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.
कोरोनाच्या वाढत्या केस असलेल्या राज्यांमधून येणाऱ्यांची कोविड चाचणी घेण्यात येइल. हा अहवाल नकारात्मक आल्यानंतरच दिल्लीत प्रवेश मिळणार आहे. पॉझिट्व्ह आल्यास विलगिकरणात ठेवणले जाईल.

भारत बंद: देशात या ठिकाणी असणार पर्यायी मार्गही बंद 

चंदीगड

चंदीगड प्रशासनाने सोमवारी होळीशी संबंधित सर्व उत्सवांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. म्हणजे होळीला भेटीचा कार्यक्रम होणार नाही.
क्लब, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये होळीवर गॅदरींग सारखे कार्यक्रम होणार नाही. कोणत्याही यात्रा मेळाव्यांना प्रदर्शनाला परवानगी देणार नाही.
राजकीय, सामाजिक मेळाव्याबरोबरच लग्नांसाठी उपायुक्तांकडून परवानगी घ्यावी लागेल.

मुंबई

मुंबई महापालिकेने सर्व खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यास बंदी घातली आहे. होलिका दहन आणि रंगपंचमी घरातीलच खेळावे लागतील. पालघर जिल्हा प्रशासनानेही अशाच प्रकारच्या निर्बंधांची अंमलबजावणी केली आहे.

रंगुया सुरक्षेच्या रंगात असे म्हणत मुंबई पालिकेने नागरिकांना घरीच होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

घराच्या नेमप्लेटवर जबरिया रिटायर्डचा उल्लेख करत अमिताभ ठाकूर यांचा केंद्रावर निशाणा 

उत्तर प्रदेश

यूपी सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि धोकादायक गटांना होळी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही मिरवणुकीत किंवा सोहळ्यास परवानगी दिली जाणार नाही.
इतर राज्यांमधून येणाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
24 ते 31 मार्च रोजी आठवीपर्यंतच्या शाळेला होळीची सुट्टी असेल.

ओडिसा

ओडिसा सरकारनेही यंदा होळी साजरी करण्यास बंदी घातली आहे.
आपण सार्वजनिक ठिकाणी होळी खेळू शकणार नाही. घरात होळी खेळण्यास कोणतेही बंधन नाही.
धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभांना परवानगी दिली जाणार नाही.

मध्य प्रदेश

लोकांना घरांच्या आत होळी साजरी करण्याचे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे.
होळीच्या निमित्ताने जत्राही होणार नाही.
कोणत्याही फंक्शनमध्ये 20 हून अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत.
मास्क जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद आहेत.

बिहार

बिहार सरकारने होळी उत्सवावर बंदी घातली आहे.
इतर राज्यातून येणाऱ्यांची विमानतळ व रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जाईल.

गुजरात 

होळीसंदर्भात गुजरात सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारने सांगितले की होळी पारंपारिकपणे मर्यादित रितीरिवाजांनी साजरी केली जाऊ शकते. रंगीच्या दिवशी सार्वजनिक समारंभ आणि गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.

होळी निमित्त घेवून येतोय Sakal Holi Beats 2k21 कार्यक्रमाची मेजवानी

संबंधित बातम्या