Holi
Holi Dainik Gomantak

Holi 2023: या गावात 300 वर्षांपासून साजरी होत नाही होळी; कारण...

Holi: त्यामुळे आता गावकरी होळी साजरी करत नसल्याची माहिती समोर आली आहे.

Holi: संपूर्ण देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्हातील तीन अशी गावे आहेत. जिथे गेल्या तीनशे वर्षापासून होळीचा सण साजरा केला जात नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वेळा या गावांमध्ये होळी साजरी करण्याचा प्रयत्न केला होळीचा सण साजरा केल्यानंतर गावांमध्ये गंभीर आजार पसरल्याची घटना घडली. त्यामुळे आता गावकरी होळी साजरी करत नसल्याची माहिती समोर आली आहे.

क्वीली, कुरझण आणि जोंदला या गावात आजपर्यत होळी साजरी केली गेली नाही. या गावात अशी आख्यायिका आहे की होळी साजरी केली तर गावातील भूम्याल देवता आणि आणि कुलदेवी नाराज होतात, त्यांचा श्राप गाववर असल्याचे म्हटले जाते.

Holi
मनीष सिसोदियांना कारागृहात भगवत गीता ठेवण्याची परवानगी, 20 मार्चपर्यंत राहणार तिहार जेलमध्ये

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील भ्यूमाल देवता भेलदेव आहे आणि कुलदेवी नंदादेवी आणि त्रिपुरासुंदरी आहे.

होळी साजरी केली तर देवतांचा श्राप लागतो आणि गावात आजार पसरतो. हा आजार फक्त माणसानांच नाही तर जनावरांमध्येही हा आजार पसरतो आणि त्याने अकाली मृत्यू होतो. त्यामुळे गावकऱ्यांनी होळीचा सण साजरा करणे बंद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com